Breaking News

उधारीच्या पैशांसाठी मध्यरात्री मित्रानेच केलं काडं,

 भंडाऱ्यातील 'त्या' हत्येचं गूढ उलगडलं; 

उधारीच्या पैशांसाठी मध्यरात्री मित्रानेच केलं काडं, 

आधी खून केला अन् नंतर..


महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, भंडारा : जिल्ह्यातील नांदोरा टोली (हेटी) येथे एका 35 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. जीशान मोहम्मद शेखरा, धारगाव ता. भंडारा असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. जीशान मोहम्मद शेखरा याची बुधवारी रात्री 11:30 च्या सुमारास हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू होता. अखेर या तपासाला यश आलं असून, एका संशयीत आरोपीला अटक करण्यात आलं आहे.


घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जीशान मोहम्मद शेखरा या 35 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर त्याचा मृतदेह दीडशे फुटांपर्यंत फरफरटत नेल्याचं समोर आलं. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली होती, गुरुवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी गेली. पोलिसांनी घटनेचं गांर्भीय लक्षात घेऊन तापसाला सुरुवात केली. पोलिसांच्या तपासाला यश आलं असून, एका संशयित  आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  आरोपी हा मृत तरुणाचा मित्रच असल्याची माहिती समोर येत आहे. उसणवारीच्या पैशांमधून ही हत्या झाल्याची माहिती मिळत आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत