पाणीपुरवठा योजनेच्या व्हाॅल्व्ह पळविणाऱ्या तीन चोरट्यांच्या सावली पोलिसांनी आवळल्या मुसक्या
45 हजार रुपये किमतीचे एअर व्हाॅल्व्ह जप्त
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, सावली : पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला लागून असलेले व्हाॅल्व्ह चोरणाऱ्या तीन चोरट्यांना सावली पोलिसांनी बुधवारी अटक केली. चोरट्यांकडून 45 हजार रुपये किमतीचे नऊ एअर व्हाॅल्व्ह जप्त केले आहेत. ओम प्रकाश पोटे, अंकुश पोटे, दोघेही राहणार पारडी तालुका सावली अजय गोहने, राहणार फोकुर्डी, तालुका चामोर्शी असे अटकेतील आरोपींची नाव आहे. तर चौथा आरोपी भंगार व्यावसायिकाला सूचना पत्रावर सोडण्यात आले आहे.
सावली तालुक्यातील शिवारातून पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन गेली आहे, या पाईपलाईन ला जागोजागी व्हाॅल्व्ह बसवण्यात आले आहे. 12 मार्च ते 1 एप्रिल या कालावधी दरम्यान नऊ एअर व्हाॅल्व्ह चोरीला गेल्याचा प्रकार सावली पोलिसांत केली. पोलिसांनी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला.
हेही वाचा : राजकीय कार्यक्रमांच्या गर्दीने नागपूरकरांसाठी एप्रिल ‘ताप’दायक
ठाणेदार आशिष बोरकर यांनी तपासाची आपली चक्री फिरवत, ओम प्रकाश पोटे, अंकुश पोटे, अजय गोहणे, यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. भंगार व्यावसायिकाला सूचना पत्र देऊन पोलिसांनी सोडले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण मडावी, चंद्रशेखर गंपलवार यांच्यासह सावली पोलिसांनी केली.
हेही वाचा : तब्बल चार मिनिटे ‘आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक’ चंद्रपूरकरांना दिसले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत