Breaking News

बेला सोसायटीच्या अध्यक्षपदी रमेश भोयर, उपाध्यक्षपदी चांगदेव खडसे

 बेला सोसायटीच्या अध्यक्षपदी रमेश भोयर, उपाध्यक्षपदी चांगदेव खडसे

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोद कुमार डांगरे, बेला : पार पडलेल्या सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस भाजप समर्थित शेतकरी पॅनलचे तेराही उमेदवार जिंकून त्यांचा एकतर्फी विजय झाला होता. काल झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत बेला येथील ज्येष्ठ कार्यकर्ते व सेवानिवृत्त शिक्षक रमेश परसराम भोयर यांची अध्यक्षपदी तर कळमन्याचे कुशल शेतकरी चांगदेव भाऊराव खडसे यांची उपाध्यक्षपदी 'अविरोध 'निवड झाली. त्यामुळे समर्थकांनी त्यांचे जल्लोषात गुलाल उधळून स्वागत केले.

    भोयर व खडसे यांनी सर्व संचालकांचे आभार मानले.अध्यासी अधिकारी गुणवंता बावनकुळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. त्यांना गटसचिव राऊत यांनी सहकार्य केले.उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष

ज्ञानेश्वर भोयर पाटील व माजी अध्यक्ष आणि काँग्रेस नेते ज्योतीकुमार देशमुख पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक यशस्वी ठरली. भोयर, देशमुख यांचे सह माजी अध्यक्ष वासुदेव कांबळे , महादेव आमनेरकर,विष्णु हावसु सोयाम,नारायण महादेव गवळी ,रमेश घुलबा रोडे,मिना नामदेव उमाटे,विजया फुलचंद उगेमुगे ,अनिल जयवंता तिमांडे,दिलीप जनार्धन झिले या संचालकांनी व पं.स. सदस्य पुष्कर डांगरे, राजेंद्र महाले,राजेश लोहकरे, यशवंत डेकाटे, अभिनव गोळघाटे,प्रशांत नागोसे, राजू चिपडा, अशोक नकले व अनेक कार्यकर्त्यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत