Breaking News

महाराष्ट्र सुरक्षारक्षक महासंघाचे तूट पुंज्या वेतनावाडीच्या विरोधात आंदोलन

 महाराष्ट्र सुरक्षारक्षक महासंघाचे तूट पुंज्या वेतनावाडीच्या विरोधात आंदोलन

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, अविनाश मुंढे, पुणे : पुण्यातील महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे तुटपुंज्या वेतनवाढीच्या विरोधात धिकार आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या वतीने कामगार मंत्री सह आयुक्त कामगार माथाडी आणि मंडळाचे अध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या सुरक्षा रक्षकांच्या तुटपुंजी पगारवाढीचा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ सलग्न भारतीय मजदूर संघ पुणे जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध व सुरक्षारक्षकांची केलेल्या आर्थिक पिळवणूक या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ सलग्न भारतीय मजदूर संघाने सुरक्षा रक्षकांच्या वेतन वाढ वाडी संदर्भात अनेक पत्र पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ व कामगार आयुक्त कामगार मंत्री प्रधान सचिव यांना 20% किमान 4000 वेतन वाढन वाढ मिळावी, असे अनेक आंदोलन करून अनेक पत्र व्यवहार केलेले आहेत. मात्र एप्रिल 2022 पासून वेतनवाढ प्रलंबित होती. कामगार मंत्री महोदय सांगत होते की कमिटी स्थापित केली असून, लवकरच वेतन वाढ जाहीर करू वेतन वाढ 2 मे 2023 रोजी कामगार विभागाचे आवर सचिव यांनी पत्र काढून जाहीर केली सदर पत्रकात वेतन व भत्ते आणि लेवी मिळून 2100 रुपये इतकी तुटपुंजी वाढ केल्याने सुरक्षा रक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, कामगार मंत्री सुरेश खाडे व संबंधित अधिकार यांनी सुरक्षा रक्षकांची आर्थिक पिळवणूक केली असून यांचा जाहीर निषेध व्यक्त करत असून महासंघ देखील मंत्री महोदय यांच्या प्रतिमेवर शाही फेकून जाहीर निषेध व्यक्त केला आहे. 

अशी माहिती महासंघाचे जिल्हा अध्यक्ष युवराज नाळे जिल्हा सचिव तुकाराम कुंभार पिंपरी चि अध्यक्ष राजकुमार काळे पि चिं सचिव अजित लकांळे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पारधी प्रदेश संघटन मंत्री अविनाश मुंढे प्रदेश उपाध्यक्ष शंभू खंडाळे प्रदेश महीला उपाध्यक्ष नंदा धोञे प्रदेश महीला सचिव मिना शिंदे प्रदेश महिला प्रमुख मंजना आढारी प्रदेश महिला संघटन मंत्री मिना आढारी पिं चि उपाध्यक्ष सयाजी कदम यांनी दीली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत