Breaking News

अषित प्राथमिक शाळा पवनी येथे महाराष्ट्र दिन संपन्न.

 अषित प्राथमिक शाळा पवनी येथे महाराष्ट्र दिन संपन्न.

महा घडामोडी न्यूज नेटवर्क, पवनी : अषित प्राथमिक शाळा पवनी येथे ६३वा.महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रंजितभाऊ शिवरकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी उपस्थित सर्वांनी राष्ट्र ध्वजाला सलामी देऊन सामुहिक राष्ट्रगीत गायन करुन महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचा जयजयकार करीत घोषणा दिल्या.यानंतर उपस्थित सर्वांनी सामुहिकपणे "जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" हे राज्य स्फुर्ति गित गायन केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही.बिसने यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेतील शिक्षक वृंद पी.डी.भोयर,एम.एम.जिवतोडे, सुप्रिया रामटेके,धनश्री मुंडले, प्रमिला बिसने, विजुमाला साखरकर,करुना वाघमारे तथा शालेय विद्यार्थी व पालक वर्ग यांच्या विशेष उपस्थितीत महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक ए.आर.गिरी‌ यांनी करुन उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्त्व विशद केले.शेवटी प्रसादाचे वितरण करुन कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत