ग्रामपंचायत कार्यालय बेला येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
ग्रामपंचायत कार्यालय बेला येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोद कुमार डांगरे, बेला : दिनांक ३१/०५/२०२३ रोज बुधवारला १ वाजता ग्रामपंचायत कार्यालय बेला येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या फोटोचे पूजन मा.जिल्हा परिषद सदस्या मा. सौ. वंदनाताई अरूनजी बालपांडे व मा.सरपंच अरुण देवरावजी बालपांडे यांच्या हस्ते करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्त्री सन्मान पुरस्कार कार्यक्रम अंतर्गत बेला गावातील सौ. प्रज्ञा अवचट व सौ. नूतन हेडाऊ यांचे शाल, ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित मा.उपसरपंच प्रशांत देवरावजी लांबट ग्रा.प.बेला, तसेच सदस्य ग्रा.प. बेला श्री. नितिन सूर्यभान बालपांडे.सौ नीतू किशोर आत्राम, सौ. शालुताई लांडे, सौ. हिराताई झगडे, सौ. शालुताई गंधारे, सौ.सुनीता कावळे उपस्थित होते.
तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व इतर महिला भगिनी यांचा उपस्थितीमध्ये महीलाचा सत्कार करण्यात आला तसेच ७ महिलांचे अर्ज ग्रामपंचायत बेला ला प्राप्त झाले त्या सर्व महिलांची नावे खालीलप्रमाणे, सौ.सुनंदा ज्ञानेश्वर उकुंडे सौ. माया रवींद्र थुल सौ.सविता हरीश रोडे या सर्व महिलांचा पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सौ.सुवर्णा पुष्कर डांगरे व सौ.मनीषा राजेश लोहकरे या काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत