लाच - लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे नवीन पोलिस उपअधीक्षक म्हणून मंजुषा भोसले यांची नियुक्ती
लाच - लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे नवीन पोलिस उपअधीक्षक म्हणून मंजुषा भोसले यांची नियुक्ती
महा घडामोडी न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : अँटी करप्शन ब्युरो (लाच - लुचपत प्रतिबंधक विभाग) चंद्रपूर येथे नवीन पोलिस उपअधीक्षक म्हणून मंजुषा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या शिस्त प्रिय अधिकारी म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची(लाच मागणाऱ्या ) थेट तक्रार लाचलुचपत कार्यालयात करण्याचे त्यांनी आव्हान केले आहे.
मंजुषा भोसले यांनी या आधी गुन्हे प्रकटीकरण विभाग,सिंधुदुर्ग ,रत्नागिरी,रायगड तसेच दहशत विरोधी पथकामध्ये काम करत आपला यशस्वी कारकीर्द पार पाडलेली आहे.त्यांना चंद्रपूर जिल्ह्याची जवाबदारी मिळालेली असून जिल्ह्यातील पोखरलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत