बेला येथे आजपासून गुरुपौर्णिमा उत्सव, कोलबास्वामी पिठात विविध कार्यक्रम
बेला येथे आजपासून गुरुपौर्णिमा उत्सव, कोलबास्वामी पिठात विविध कार्यक्रम
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोद कुमार डांगरे, बेला : भगवान कोलबास्वामी यांची बेला ही जन्मभूमी आहे. ते पंढरपूर येथील पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते. त्याप्रित्यर्थ परंपरेनुसार बेला येथे गुरुपौर्णिमेचा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने आज (3 जुलै)पासून पाच जुलै पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पिठाचे मुख्य आचार्य तथा समाजभूषण पुरस्कारार्थी राधेश्यामस्वामी प्रामुख्याने उपस्थित राहून भक्तांना मौलिक मार्गदर्शन करणार आहे..
गुरुस्वामी विश्व मिशन शाखा आनंदनगर च्या वतीने 3 जुलैला श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ बेला यांचे रात्री भजन होईल. रात्रीला एक ते तिन पर्यंत प पू. जगद्गुरु राधेश्यामस्वामी यांचे 'संत हेचि देव' या विषयावर अध्यात्मिक तत्वज्ञानावर कीर्तन, चार जुलै ला सकाळी अभिषेक , पिठाचे अध्यक्ष रमेश मेंडूले ,माजी सभापती शालु मेंधूले यांच्या वतीने राधेश्याम स्वामी, गुरुमाऊली रमादेवी, गुरुदेव भक्त ह भ प सुरेश साठवणे महाराज, भोले बाबा उर्फ भालचंद्र बाबा व आचार्य शंकरराव चोपडे आदी मान्यवरांचे नविन वस्त्र श्रीफळ देऊन पुष्पमालेने जंगी स्वागत करण्यात येईल.
बेलानगरीतून धूमधडाक्याने दिंडी पालखी यात्रा निघेल . दहीहंडी उत्सवात ह भ प डॉ शंकरराव चोपडे महराज, आमदार गिरिधर व्यास, मायाताई धांडे, भगवान पंढरीनाथ महाराज उपस्थित राहतील असे राधेश्याम स्वामींनी कळविले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष रमेश मेंधूले, वेणुबाई कुंभारे, लताबाई देशमुख कृिश्णा मेंढूले, सुशील धार्मिक, रामरावजी धार्मिक , लक्ष्मण खोडके, उजव ने गुरुजी , देवराव महाजन, माणिकराव देशमुख, रत्नाकर हेटे, श्रीहरी बारापत्रे, किरण चांदेकर, मधुकर पौनिकर, शोभा हिंगणीकर आधी भक्त व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत