Breaking News

आदर्श शाळेत जागतिक कागदी पिशवी दिन साजरा.

आदर्श शाळेत जागतिक कागदी पिशवी दिन साजरा.
- राष्ट्रीय हरित सेनेच्या विध्यार्थीकरिता कागदी पिशवी तयार कारण्याचे प्रात्यक्षिक.
महाघड़ामोडी न्युज नेटवर्क : लोकेश पारखी तालुका प्रतिनिधी
राजुरा : बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय सेनेच्या विद्यार्थ्यांकरीता जागतिक कागदी पिशवी दिनानिमित्त कागदाच्या पिशव्या तयार कारण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी मुख्य मार्गदर्शक  तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राहुल अवधूत, शाखा व्यवस्थापक, सन्मित्र महिला बँक शाखा राजुरा यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून विजयकुमार जांभुळकर,  प्रशासकीय अधिकारी नगरपरिषद राजुरा तथा नागपूर विभाग अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, उपेंद्र धामणगे, कर निरीक्षक, न. प. राजुरा, बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, सहाय्यक शिक्षिक, रुपेश चिडे,जयश्री धोटे, हरित सेना विध्यार्थीनी प्रमुख मानसी साईनाथ बोबडे, विध्यार्थी प्रमुख यश रोहिदास कुळमेथे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
राहुल अवधूत यांनी विध्यार्थीना कागदापासून पिशवी बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच विध्यार्थीनी सहभागी होऊन पिशव्या तयार केल्या.
 12 जुलै हा दिवस जागतिक कागदी पिशवी दिवस (वर्ल्ड पेपर बॅग डे) म्हणून साजरा केला जातो.  हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे प्लास्टिक कचरा कमी होण्यास मदत करण्यासाठी प्लास्टिक ऐवजी कागदी पिशव्या वापरण्याविषयी जनजागृती करणे. दीडशेहून अधिक वर्ष पाश्चत्य कागदी पिशव्या वापरत आहे आणि आपण अजूनही त्यांना मनापासून स्वीकारलं नाही याने आपण आपलं आणि पर्यावरणाचे अपरिमित नुकसान केलं आहे. आता हा हट्ट आपण सोडून द्यायला पाहिजे आणि कापडी व कागदी पिशवीचा वापर केला पाहिजे. असे प्रतिपादन विजयकुमार जांभुळकर यांनी केले. सरकारने प्लास्टिक पिशवी बंदी आणली आहे ती थोडीशी त्रासदायक आहे पण दीर्घकालीन परिणाम पाहता समाजाच्या हिताचीच आहे. कागदी पिशव्या हानिकारक प्लास्टिक पिशव्यासाठी पर्यावरणास अनुकूल पर्याय आहे असे मत राहुल अवधूत यांनी व्यक्त केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शुभम सोळंके, सन्मित्र महिला बँक राजुरा, राष्ट्रीय हरित सेना विध्यार्थी प्रमुख सुहाना नितीन पहाणपटे, समृद्धी गणेश येरणे,  जागृती विकास धंदरे, मैथिली संजय रेगुंठावार, तेजस्विनी अरुण धानोरकर,  भाग्यश्री नत्थू इटनकर,  अनुज विकास भटारकर, कुणाल बंडू गिरडकर, ध्रुव रवींद्र वाटेकर, आर्यन संजय वांढरे आदीसह हरियाल गट, ब्लु मॉरमन गट, ताम्हण गट, किंग कोब्रा गट, शेकरू गटातील विध्यार्थीनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत