Breaking News

आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल शाळेत आरोग्य तपासणी.

दिश्चर्यचे योग्य पालन केल्यास आरोग्य सुदृढ राहील. - डॉ. डुकरे
- आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल शाळेत आरोग्य तपासणी.
महाघड़ामोडी न्युज नेटवर्क: लोकेश पारखी तालुका प्रतिनिधी
राजुरा दरवर्षी प्रमाणे शैक्षणिक सत्र 2023-24 ची शालेय विध्यार्थीची आरोग्य तपासणीला सुरुवात झाली. बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथे आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य तपासणी करिता डॉ. सुरेंद्र डुकरे,  वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय राजुरा, समरीन शेख, वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय राजुरा,  सचिन सातभाई,औषध निर्माण अधिकारी, कमल केंद्रे, परिचारिका, संस्थेचे सचिव भास्करराव येसेकर, मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी विध्यार्थीना मार्गदर्शन करताना डॉ. डुकरे म्हणाले, विध्यार्थीनी स्वच्छतेच्या चांगल्या सवयी नियमितपणे पाढल्यास त्यांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहील. चांगला आहार, नियमित व्यायामाच्या सवयी असल्यास शरीर सुदृढ आणि तंदुरुस्त राहील. ज्या विध्यार्थीना आरोग्यविषयक समस्या असल्या त्यांना योग्य तो औषधोपचार करण्यात आला. तसेच पुढील निदानाकरिता योग्य तो वैद्यकीय सल्ला देण्यात आला. सूत्रसंचालन रुपेश चिडे, सहाय्यक शिक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका नलिनी पिंगे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत