Breaking News

कळमण्यात महसूल चा जनसंवाद

 कळमण्यात महसूल चा जनसंवाद

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोद कुमार डांगरे, बेला : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या हिताच्या सोयीसाठी महसूल विभागामार्फत शेतकऱ्यांच्या समस्येचे लगेच निराकरण करण्यासाठी शेतकरी जनसंवाद चे आयोजन कळमना( बेला ) गट ग्रामपंचायत इथे नुकताच आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती गटनेता पुष्कर डांगरे होते. नायब तहसीलदार मनोज वाडे, उपसरपंच सचिन भाकरे, संजय गुजर मंचावर प्रमुखात उपस्थित होते.

 आता शेतकऱ्यांनीच ई पी द्वारे शेतातील पिकाची नोंदणी करायची आहे . शेतकऱ्यांना तुरंत सातबाराचे वाटप करून समस्या सोडविण्यात आल्या. सोबतच संजय गांधी निराधार योजनेच्या निराधारचे नवीन केसेस बनवण्यात आल्या. राशन कार्ड बाबत , पांदन रस्त्याच्या नूतनीकरणाची कामे व शेतात जाणारे रस्त्याची विल्हेवाट लावण्यात आली. अतिक्रम धारकांना तंबी देऊन रस्ता मोकळे करण्याचे सांगण्यात आले , बऱ्याच रेंगाळत असलेला फेरफार निकाली काढण्यात आले. महाराष्ट्र शासनाची पीक विमा योजनाचे लिंक व्यवस्थित नसल्याने काही शेतकऱ्यांच्या विमा काढण्याची काम राहून गेल्याचे कळले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालन तलाठी संजय गुजर यांनी केले तर आभार उपसरपंच सचिन भाकरे यांनी मानले हा कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी कृषी सहाय्यक चेतन बारसागडे पोलीस पाटील बाबा गोळघाटे, प्रमोद खडसे, से. स.चे उपाध्यक्ष चांगदेव खडसे , संदीप झिले धनराज खोडे, नरेंद्र शहाणे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत