Breaking News

अतिवृष्टी जाहीर करा- हकानी शेख

 अतिवृष्टी जाहीर करा- हकानी शेख

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : तालुका हा डोंगराळ भाग असल्याने खरीपचे पीक घेतले जातात या वर्षी जुन महिन्यात पाऊस पडला नाही शेतकऱ्यांने पीकाची पेरणी जुन महिन्यांत केली पाऊस पडला नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना दुमार पेरणी करावी लागली आणि जुलै महिन्यात अतिपाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे उभ्या पीकांचे नुकसान झाले असून जिवती तालुका अतिवृष्टी जाहीर करून शेतकऱ्यांचा खात्यात अनुदान रक्कम जमा करावी अतिवृष्टी जाहीर झाली नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिवती तालुक्याच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तहसीलदार जिवती यांना हकानी शेख तालुका अध्यक्ष व मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत