Breaking News

विविध उपक्रमांनी साजरा केला बादल बेले यांचा वाढदिवस.

विविध उपक्रमांनी साजरा केला बादल बेले यांचा वाढदिवस.
- ब्लॅंकेट वाटप, विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण व पर्यावरण पूरक गणेशोत्सव जनजागृतीचे केले आयोजन.
- सामाजिक कार्यकर्ते मित्रमंडळाने केले आयोजन..
महाघडामोडी न्यूज नेटवर्क,राजुरा तालुका प्रतिनिधी:लोकेश पारखी
राजुरा:नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, शिवाजी महाविद्यालयाचे माजी विध्यार्थी संघ सचिव, तेली युवक मंडळ राजुरा कार्याध्यक्ष, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, स्काऊट मास्तर, राष्ट्रीय ओबीसी महासंघ राजुरा महासचिव,पत्रकार बादल बेले यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना ब्लेंकेट वाटप, विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते मित्रमंडळ परिवारातर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश धोटे, अध्यक्ष, बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून अविनाश जाधव, सचिव, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा तथा माजी जी.प.सदस्य, डॉ. संभाजी वारकड, प्राचार्य, श्री शिवाजी महाविद्यालय, डॉ. राजेश खेराणी,उप प्राचार्य, मनोहर साबनानी, उपाध्यक्ष, भास्कर येसेकर, सचिव, मधुकर जानवे, संचालक, अल्का सदावर्ते, संचालिका, पुरुषोत्तम गंधारे, सचिव, श्री संत संताजी जगनाडे शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा, ऍड. डॉ. सत्यपाल कातकर, रजनी शर्मा, नागपूर विभाग अध्यक्षा, राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समिती, अविनाश दोरखंडे, अध्यक्ष, माजी विध्यार्थी संघ, किरण हेडाऊ-कोल्हापूरे, तालुका अध्यक्षा, प्रदीप सुर्वे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बादल बेले यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना ब्लेंकेट, विध्यार्थीना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण आणि मातीची गणेश मूर्ती तयार करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. विविध क्षेत्रात कार्य करीत असताना प्रत्येक क्षेत्राची जबाबदारी उत्तमपणे पार पाडत नियोजनबद्ध कार्य आणि कामातील सातत्य, विविध उपक्रम साजरे करून जनजागृती करणे, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे कार्य बादल बेले हे प्रामाणिकपणे करीत असून कुठल्याली कार्याला योग्य न्याय देणार असे हे व्यक्तिमत्त्व असल्याची मते उपस्थित मान्यवरणांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नेफडो चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मोहनदास मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करीता विविध सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत