माँ जिजाऊंच्या जयघोशाने दुमदूमली आवाळपूर नगरी
विविध स्पर्धा वेशभूषा देखावे घेत महिलांनी साजरी केली जिजाऊ जयंती
चिमुकल्यांनी,महिलांनी सादर केलेल्या नृत्यांनी आवाळपूरकर मंत्रमुग्ध
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,बिबी : स्वराज्याला दोन दोन छत्रपती देणाऱ्या स्वराज्य जननी माँ जिजाऊ यांची काल १२ जानेवारीला जयंती होती. त्यानिमित्य आवाळपूर येथे राजमाता जिजाऊ महिला मंडळ आवाळपूर च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी जिजाऊंची पालखी काढण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने माऊली भजन मंडळ आवाळपुर,सद्गुरु नामदेव महाराज महिला भजन मंडळ आवळपुर,गावातील महिला व राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या सदस्यांनी सहभाग घेतला. गावातील महिलांनी घरासमोर स्वच्छता करत वेगवेगळ्या जुन्या काळातील देखावे सादर केले. कुणी जात्यावर दळण दळण्याचा, कुणी चुलीवर भाकरी बनविण्याचा तर कुणी ठेचून मसाले तयार करण्याचे देखावे सादर केले. गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून महिलांचे व पालखीचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाला उदघाटक म्हणून आवाळपूर गावाच्या सरपंच्या प्रियंका दिवे, अध्यक्ष म्हणून ह.भ.प गोहकार महाराज, माजी सरपंच लटारी ताजणे, जेष्ठ शिक्षिका शोभा शेंडे, शिक्षक बादल दिवे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुरेश धोटे, ग्रामपंचायत सदस्य कल्पतरू कन्नाके, ग्रामपंचायत सदस्या स्वाती नगराळे, मनीषा कोट्टे, शारदा मोहुर्ले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अवंती लांडे तर प्रस्ताविक नेहा लांडे आणि आभार प्रदर्शन संध्या येलेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गावातील प्रेक्षकांचा मोठा पाठींबा लाभला.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत