युवकांनो स्वामी विवेकानंद यांची राष्ट्रनिती आत्मसात करा. - केंन्द्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज भैय्या अहिर
युवकांनो स्वामी विवेकानंद यांची राष्ट्रनिती आत्मसात करा. - केंन्द्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज भैय्या अहिर
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, रविकुमार बंडीवार, नांदा फाटा : भारताला विश्व पटलावर प्रस्थापित करणारे,युवकाचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद जयंती तथा राजमाता जिजाऊ जयंती औचित्याने भारतीय जनता पार्टी प्रेरीत निलेश ताजणे जनसंपर्क कार्यालय येथे अभिवादन सोहळा संपन्न झाला.राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज भैय्या अहिर यांचे प्रमुख उपस्थितीत राष्ट्र विचारकांना वंदन करण्यात आले.
युवकांना संबोधित करतांना माजी गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर म्हणाले की,स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घेऊन देश तथा राष्ट्र सेवेसाठी युवकांनी तत्परता दर्शविली पाहिजे.युवा सुपर वॉरियर्स यांना मार्गदर्शन करून बुथ आढावा घेण्यात आला.
यावेळी किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजु घरोटे,भाजपा जेष्ट नेते महेश शर्मा, महादेव एकरे,शिवाजी शेलोकर, युवा उद्योजक निलेश ताजणे,विधानसभा विस्तारक कार्तिक गोन्लावार, आदिवासी नेता अरूण मडावी, मनोहर कुळसंगे, संजय मुसळे,धानोली उपसरपंच ओम पवार,पुरूषोत्तम भोंगळे,वामन तुराणकर,किसन मुसळे,सुयोग कोंगरे,दिनेश खडसे,अजिम बेग,सचिन आस्वले, विशाल अहिरकर,रवी बंडिवार, जगदिश पिंपळकर,प्रमोद पायघन उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत