जिवती येथे महादेवाची भव्य यात्रेचा समारोप व कब्बडीची फायनल
जिवती येथे महादेवाची भव्य यात्रेचा समारोप व कब्बडीची फायनल
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगराळ भाग म्हणून ओळख असलेल्या निसर्गरम्य परिसर जिवती येथे भव्य महादेवाची यात्रा निमित्त कब्बडीचे खुले सामने ठेवण्यात आले होते. कब्बडीचा प्रथम पुरस्कार जय सेवालाल क्रीडा मंडळ पेदाआसापूर रोख रक्कम 21,000 रुपये तर द्वितीय पुरस्कार वसंतराव नाईक क्रीडा मंडळ करणकोण्डी रोख रक्कम 15,000 रुपये यांनी पटकविले तर शेवटचा तृतीय पुरस्कार रोख रक्कम 10,000 रुपये स्व. बळीराम नाईक राठोड क्रीडा मंडळ जिवती यांनी पटकविले, बक्षीस वितरणवेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सुदामभाऊ राठोड, अमर भाऊ राठोड, शंकर चव्हाण, राजू राठोड ममता जाधव, गणपत आडे, आशिष डसाने, कैलास राठोड, हिरामण महाराज, मंगेश सोयाम व यात्रा कमेटीचे सदस्य उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत