राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे समाजसेवेचे उत्तम साधन : प्राचार्य डॉ. बी.व्ही. धोटे
राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे समाजसेवेचे उत्तम साधन : प्राचार्य डॉ. बी.व्ही. धोटे
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, सुखसागर झाडे, चामोर्शी : हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अंतर्गत शरद पवार कला महिला महाविद्यालय चामोर्शी च्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत मौजा चाकलपेठ येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. उद्घाटन सोहळा मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड केली पाहिजे. वृक्षाचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. तसेच जातीपातीच्या पलीकडे जाऊन गाव विकासाठी झटले पाहिजे.
समाजातील सर्व प्रकारच्या जातीभेद मिटून आपण एक आहोत ही भावना जनमानसात रुजली पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करताना त्यांचा बौद्धिक, भावनिक आणि क्रियात्मक विकास करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर घेण्यात येतो. गावागावात स्वच्छ्ता,आरोग्य, पर्यावरण संवर्धन यांसाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कार्य करणे, हेच या शिबिराचे खरे फलित आहे. मी माझ्या गावाला आदर्श करू शकतो, या भावनेतून मानवतावादी विचारांना चालना देणे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.व्ही. धोटे यानी केले.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सलग्नित हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ चामोर्शि द्वारा संचालित शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिर चाकलपेठ ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. लोकशाही- मताधिकार, युवक, ,आरोग्य स्वछता,पर्यावरण,मतदार जनजागृती युवाशक्ती या संकल्पनेवर आधारित ११ जानेवारी ते १७ जानेवारी २०२४ पर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन १२ जानेवारीला जि. प. उच्च प्राथमिक शाळा चाकलपेठ येथे पार पडले.या कार्यक्रमाचे उद्घाटन चाकलपेठ येथील प्रतिष्ठित नागरिक तथा चामोर्शी खरेदी विक्री संघाचे संचालक नामदेव पाटील किनेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून अजिंक्य भाऊ गण्यारपवार प्रतिनिधी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ,चामोर्शी. या गावचे सरपंच गिताताई रायसीडाम, राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून माणूस घडविता येतो असे प्रतिपादन मार्गदर्शक राकेश भाऊ पोरटे यांनी केले संतोष किनेकर, सौ. ज्योती मडावी, सौ. वर्षा किनेकर, मुख्याध्यापक उंदीरवाडे सर, मेश्राम सर, प्रकाश पाटील रामगिगिनवार, मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा. से. यो. समन्वयक प्रा. झाडे सर यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. नितेश सावसाकडे सर तर आभार प्रा. कृणाल आंबोरकर सर यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत