एका टॉवेलमुळे मायलेकीनं गमावला जीव, मुलीला वाचवण्यासाठी आईनेही मारली नाल्यात उडी;बोथलीमधील हृदयद्रावक घटना
एका टॉवेलमुळे मायलेकीनं गमावला जीव, मुलीला वाचवण्यासाठी आईनेही मारली नाल्यात उडी;बोथलीमधील हृदयद्रावक घटना
महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे नागपूर:कपडे धुण्यासाठी नाल्यावर गेलेल्या माय लेकीचा नाल्यातील खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवार (ता. १५) रोजी सकाळी १० च्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील बोथली येथे घडली. सुषमा ऊर्फ विद्या विजय मेश्राम वय (४५) तर दिव्या विजय मेश्राम वय (१६)
कपडे धुण्यासाठी नाल्यावर गेलेल्या माय लेकीचा नाल्यातील खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवार (ता. १५) रोजी सकाळी १० च्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील बोथली येथे घडली. सुषमा ऊर्फ विद्या विजय मेश्राम वय (४५) तर दिव्या विजय मेश्राम वय (१६)
उन्हाळी धानाची लागवड असल्यामुळे सध्या नाल्याला भरपूर पाणी आहे. त्यामुळे गावातील महिला या ठिकाणी रोज कपडे धुण्यासाठी जातात. सकाळची घरातील कामे आटोपून सुषमा व तिची आई दिव्या मेश्राम या नाल्यावर कपडे धुण्यासाठी गेल्या. गावा शेजारून हाकेच्या अंतरावर बोथली ते बारव्हा नाला वाहत आहे.
याच नाल्यावर वनराई बंधारा असल्यामुळे पुढे पाणी जास्त असते. कपडे धुताना दिव्याच्या हातून टॉवेल निसटला. तो टॉवेल घेण्यासाठी मुलगी सुषमा पाच मीटर पुढे धावली त्यातच ती बुडाली. मुलगी बुडत असल्याचे पाहून तिची आई मुलीला वाचविण्यासाठी धावली. पण पाणी खोल असल्याने ती सुद्धा पाण्यात बुडाली. दोन्ही मायलेकी बुडताना बघून त्यांच्या सोबत असलेल्या दोन महिलांनी घटनेची माहिती तत्काळ गावकऱ्यांना दिली.
सदर घटनेची माहिती दिघोरी पोलिसांना मिळताच ठाणेदार धंदर व इतर पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोघींचाही मृत्यू झाला होता. ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही शव पाण्यातून बाहेर काढले. दिघोरी पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूरला पाठविले असून पुढील तपास दिघोरी पोलिस करीत आहेत. बोथली गावातील मायलेकीचा मृत्यू एकाच वेळी झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत