Breaking News

समृद्धी महामार्गावर मोठा अपघात, उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक; चालकाचा जागीच मृत्यू

 समृद्धी महामार्गावर मोठा अपघात, उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक; चालकाचा जागीच मृत्यू

महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे नागपूर: धामणगाव तालुक्यातील तळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक १२४ जवळ उभ्या ट्रक पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने यामध्ये पश्चिम बंगाल राज्यातील ट्रक चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

कंमहटेनर ट्रक क्रमांक एन. एल. ०१ ए.ए. ४१९० ने उभ्या अससलेल्या ट्रकला धडक दिली. त्यामुळे अपघात झाला. ट्रक क्रमांक यूपी ७२ एटी ३३०२ चा चालक मो. इब्राहिम मो. इलियास प्रतापगड उत्तर प्रदेश व क्लीनर मो अमीर मो-सलीम खान प्रतापगड उत्तरप्रदेश हे ट्रकचा टायर रोडच्या साईडला ट्रक उभे करून बदलत होते. त्याचवेळी उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली त्यामुळे अपघात झाला.

यात चालक सुभाश चंद्रबोद बोदरा रा. पाला हावडा पश्चिम बंगाल हा ट्रकमध्ये अडकला होता. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी सदर ट्रक चालकाला बाहेर काढून त्याला रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे पाठविले. तसेच दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे पाठविले. पोलिसांनी अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत