Breaking News

परीक्षा देऊन आनंदात घरी आली अन् काळानं घाला घातला, खेळताना आठवीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

परीक्षा देऊन आनंदात घरी आली अन् काळानं घाला घातला, खेळताना आठवीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे नागपूर: इमारतीच्या सातव्या माळ्यावरून पडून आठव्या वर्गाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. १५) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. जानवी सुजित राठोड (वय १३, रा. बालाजीनगर, अमरावती), असे मृत विद्यार्थिनीचे नाव असल्याचे खोलापुरीगेट ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्वाती पवार यांनी सांगितले.

जानवीचा सीबीएसस्सी पॅटर्नच्या सेकंड सेमिस्टरचा पेपर होता. पेपर सोडवून दुपारी ती घरी परत आली. त्यानंतर घराजवळच असलेल्या राधाकृष्ण अपार्टमेंटच्या सातव्या माळ्यावर गेली. जानवीचा या इमारतीच्या सातव्या माळ्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी खोलापुरीगेट पोलिसांनी अकस्मात मृत्यू, अशी नोंद घेतली.

रेसिडेन्सीमधील आसपासच्या नागरिकांनी गंभीर जखमी स्थितीत जानवीला उपचाराकरिता आधी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले होते. तेथून पुढील उपचाराकरिता खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान जानवी राठोड हिचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रकरण विद्यार्थिनीच्या मृत्यूशी संबंधित असल्याने अनेक मुद्यांसंदर्भात तपास केल्या जाईल. अद्याप अकस्मात मृत्यू, एवढीच नोंद घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत