Breaking News

श्रीराम फायनान्स तर्फे विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

श्रीराम फायनान्स तर्फे विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

महाघडामोडी न्युज नेटवर्क,राजुरा तालुका प्रतिनिधी ,लोकेश पारखी
राजुरा:दि १०/०८/२०२४ रोजी श्रीराम फायनान्स राजुरा तर्फे श्री.अतुल काळे यांच्या सूचनेनुसार व मनोहर तंगळपल्लीवर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद येथिल परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करण्यात आला.


या वेळी वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे असे प्रतिपादन मनोहर तंगळपल्लीवार यांनी केले आहे.
यावेळी सुनिल रामटेके , तनवीर शेख, विशाल कायरकर, लोकेश पारखी , चंदू मांडवनकर, आदिबा शेख हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत