शेतकरी जनसंवाद यात्रेचा बाळूमामा देवस्थान शंकरपठार येथे समारोप
शेतकरी जनसंवाद यात्रेचा बाळूमामा देवस्थान शंकरपठार येथे समारोप
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, हकानी शेख, जिवती :- तालुक्यातील विविध मागण्या घेऊन शेतकरी संघटनेची शेतकरी जनसंवाद यात्रेला परमडोली येथून सुरुवात करण्यात आली होती. शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदामभाऊ राठोड यांच्या सोबत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी जिवती तालुक्यातील गाव खेड्यात जाऊन शेतकरी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधून यात्रेचे मागण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यात जनतेच्या चांगला समर्थन मिळाला. यात्रेच्या चौथ्या दिवसी शेतकरी जनसंवाद यात्रेला बाळूमामा देवस्थान शंकरपठार येथे समारोप करण्यात आले.
या समारोपाच्या जाहीर सभेत प्रमुख मागण्या बद्दल एडवोकेट माजी आमदार वामनरावजी चटप साहेबांनी लोकांना मार्गदर्शन केले केंद्र सरकारने वनहक्क कायद्यात तातडीने दुरुस्ती करून तीन पिढ्यांची अट व २५ वर्षांची एक पिढी हे स्पष्टीकरण त्या कायद्यातून काढून टाकावे.व सर्व अतिक्रमण धारकांना जमिनीचे मालकी पट्टे देण्यात यावे. शेतीपंपाचे थकीत बिल तात्काळ माफ करावे. सर्व शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्यात यावे अशी अनेक मागण्या घेऊन शेतकरीजनसंवाद यात्रा काढण्यात आली होती.
यात्रेच्या समारोपाला शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार एड. वामनरावजी चटप साहेब उपस्थित होते व नीलकंठ कोरांगे जिल्हाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष, शब्बीर जागीरदार जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी संघटना, देविदास वारे उपाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष,नरसिंग हामने तालुका उपाध्यक्ष शेतकरी संघटना,गणेश कदम तालुकाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष, रामेश्वर नामपल्ले शेतकरी संघटना युवा आघाडी तालुकाध्यक्ष,विशाल राठोड युवा आघाडी तालुकाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष , दत्ता राठोड शहर अध्यक्ष, रवींद्र राठोड,गोविंद गोरे,मनोज राठोड, बालाजी वाघमारे, शाहीर चक्रधार तोगरे रामचंद्र ,खटके, प्रामुख्याने उपस्थित होते व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित झाले होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत