शेणगांव ते भारी रस्ता झाला जर्जर बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
शेणगांव ते भारी रस्ता झाला जर्जर बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, हकानी शेख, जिवती : तालुक्याच्या विकासाकडे शासन प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे रस्त्याचे पार वाट लागली आहे. तालुक्यात रस्त्याचे जाळे पसरले आहे. परंतु रस्ते निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे आज रस्त्याची बिकट परिस्थिती झाली आहे तालुक्यातील काही भागातील रस्त्यावरून वाहन चालवण्याची भीती निर्माण झाली आहे.
शेणगांव ते भारी डांबरीकरण रस्ता १३ किलोमीटर नावालाच आहे. बैलबंडीच्या रस्ता तरी बरा अशी जर्जर अवस्था रस्त्याची झाली असून या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डेच खड्डे निर्माण झाले असल्याने रस्त्यावर गिट्टी पसरल्यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यामुळे वाहन चालकांना मणक्याच्या त्रास उद्भवत आहे.
रस्त्यावर गिट्टीच्या साम्राज्य निर्माण झाल्यामुळे वाहन चालवताना धुळ उडत असल्याने समोरच्या काही दिसत नाही त्यामुळे आतापर्यंत लहान मोठे भरपूर अपघात झाले आहे. या धुळीमुळे अस्थमा दमा रोग होण्याची शक्यता आहे. रस्त्यावरच्या मोठमोठे खड्ड्यामुळे अपघात होऊन एखाद्याच्या जीव जाऊ शकते त्यामुळे शासन प्रशासनाने जिवती तालुक्यातील सर्वच रस्त्यावर लक्ष देण्याची गरज भासत आहे. शेणगांव ते भारी रस्त्याची दुरुस्ती करावी व तालुक्यातील रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत