Breaking News

जंगोदेवी देवस्थानाच्या विकासाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा

 जंगोदेवी देवस्थानाच्या विकासाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा

गो. ग. पा. नेते गजानन पाटिल जुमनाके यांची निवेदनातून मागणी

महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, जिवती : तालुक्यातील कोठापरमडोली स्थित आदिवासी समाजाची आराध्य दैवत रायताड जंगोदेवीच्या देवस्थान परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार व राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांना निवेदनातून करण्यात आली आहे.

जंगोदेवी हे "क" वर्ग तीर्थ क्षेत्र म्हणून शासनाने घोषित केले आहे, येथे दरवर्षी पौष महिन्यात एक महिना जत्रा भरते, देवस्थानात महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश, कर्नाटक राज्यातील भाविक भक्तगण येतात, या काळात सुमारे 50 हजार भक्तगण दर्शन घेतात, ऑक्टोंबर महिन्यात 3 दिवस पारंपरिक दसरा महोत्सव साजरा केला जातो. 

या काळातही भाविक येऊन पूजा अर्चा करतात, परंतु येथे सुविधांचा अभाव असल्याने भाविकांची गैरसोय होत आहे, त्यामुळे देवस्थान परिसरात सुरक्षा भिंत बांधणे, गट्टू बसवणे, स्वच्छता गृह बांधकाम करणे, भाविकांना थांबण्यासाठी भक्त निवास बांधकाम करणे अश्या विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करून देण्यात यावा अशा आशयाचे निवेदन गोंडवाना गणतंत्र पार्टीने माजी मंत्री, आमदार मुनगंटीवार व आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे सुपूर्द केले. 

आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार भोंगळे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत रायताड जंगोदेवी देवस्थानाचा विकास आराखडा तयार करून तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नेते गजानन पाटील जुमनाके यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला दिले. 

याप्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नेते गजानन पाटील जूमनाके, माजी जिल्हाध्यक्ष बापुराव मडावी, माजी सभापती भीमराव मेश्राम, जिवती तालुकाध्यक्ष हनुमंत कुमरे, युवा सामाजिक कार्यकर्ते अनिल आडे यांच्यासह गोंडवाना गणतंत्र पार्टीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत