भारी बाबापुर परिसरातून रेती उत्खनन जोमात वन अधिकारी व महसूल अधिकारी कोमात
भारी बाबापुर परिसरातून रेती उत्खनन जोमात वन अधिकारी व महसूल अधिकारी कोमात
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर / जिवती : जिवती तालुका महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर तेलंगाना राज्याच्या सीमेला लागून असल्याने हा तालुका खनिज संपत्तीने ओळखला जात असून या तालुक्यातून मौल्यवान मुरूम दगड व रेतीची खूप मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात असून सुद्धा याकडे संबंधित वन विभागाचे व महसूल विभागाचे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
तेलंगाना या राज्याच्या सीमेला लागून बाबापुर, शेडवाई, भारी या गावाच्या परिसरात नदी नाले असल्याने या नदी नाल्यात मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे उपलब्ध असून या नदी नाल्यातून मोठ्या प्रमाणात खुल्याआम रेतीची उत्खनन करण्यात येत आहे. याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना असून सुद्धा रेतीमाफ्यावर कसल्याच प्रकारची कारवाई करण्यात येत नाही आहे.
रेती माफिया भारी या गावाचा असल्यामुळे या रेतीमाफ्याकडे ट्रॅक्टर असून ट्रॅक्टरने दररोज रेतीची उपसा करून परिसरात खुलेआम अवैध रेती विकली जात आहे. हा रेतीचोर एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याने या रेती चोरावर अधिकारीही कारवाही करत नसल्याची चर्चा सुरू आहे. हा रेती माफिया वन विभागाच्या व महसूल विभागाच्या अधिकाऱ्याला हातात धरून खुलेआम नदी नाल्यातून रेती उपसा करून, परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीविक्री करत असल्याचे विदारक चित्र दिसून सुद्धा या रेती माफ्याला या विभागांनी खुलेआम सूट दिली असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या रेतीमाफ्यावर कारवाई होणार का किंवा रेती चोरण्यासाठी मोकळीक देण्यात येईल का चर्चेला उधाण आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत