Breaking News

"सेवा नाही, उद्धटपणा मात्र भरपूर !" – ग्राहकाचा बुट्टीबोरीतील समृद्धी हॉटेलविरोधात आक्रोश

सेवेऐवजी उद्धट वर्तन – ग्राहकांनी समृद्धी हॉटेलवर टीकेची झोड उठवली

बुट्टीबोरीचे नामांकित हॉटेल समृद्धीच्या मालकाचा ग्राहकाशी वाद


महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, नागपूर : बुट्टीबोरी शहरातील नामांकित हॉटेल समृद्धीमधील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हॉटेलमालकाने एका ग्राहकासोबत उध्दट वर्तन करत झगडा केल्यामुळे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले आहे.

माहितीनुसार, ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. ग्राहक हॉटेलमध्ये रात्री थांबण्यासाठी आला होता. स्टाफ ने सर्विस न दिल्यामुळे त्यांनी व्यवस्थापकाकडे नाराजी व्यक्त केली. यानंतर वाद विकोपाला गेला आणि हॉटेलमालकाने ग्राहकाशी उध्दट भाषेत बोलत त्याला हॉटेलबाहेर जाण्यास सांगितले. या वादात हॉटेलमालकाचा आवाज चांगलाच चढल्याने परिसरातील इतर ग्राहकांनीही या घटनेला साक्षीदार होण्याचा प्रसंग ओढवला.

हॉटेलमालकाने त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवायचा प्रयत्न केला. दिलेल्या तक्रारीत ग्राहकाला दबावात आणण्याचा प्रयत्न हॉटेलमालकाचा होता. हॉटेलमालकाच्या अश्या वर्तनामुळे ग्राहकाला मानसिक त्रास झाल्याचा उल्लेख केला आहे.

हॉटेलमालकाची प्रतिक्रिया

दरम्यान, हॉटेलमालकाने आपली बाजू मांडताना सांगितले की, ग्राहकानेही गैरवर्तन केले होते. "प्रत्येक गोष्ट वेळेत पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, मात्र जेव्हा एखादा ग्राहक मर्यादा ओलांडतो, तेव्हा आम्हाला कठोर पावले उचलावी लागतात," असे हॉटेलमालकाने सांगितले.

सध्या हे प्रकरणाचा पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावून घेतल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.या घटनेमुळे हॉटेलमध्ये जाणाऱ्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सोशल मीडियावरही या घटनेवर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

कस्टमर रिव्ह्यूही अत्यंत नकारात्मक

संबंधित हॉटेलच्या सेवेबाबत ग्राहकांनी यापूर्वीच नकारात्मक रिव्ह्यू दिले आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अनेक ग्राहकांनी आपल्या प्रतिक्रियांमध्ये सेवेची निकृष्ट गुणवत्ता, कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा, आणि जेवणाच्या दर्जाबाबत तक्रारी केल्या आहेत.

ग्राहकांच्या प्रतिक्रिया:

"सेवा खूपच वाईट आहे!"

– एका ग्राहकाने लिहिले आहे, "आम्ही कुटुंबासोबत जेवायला गेलो होतो, पण 60 मिनिटांनंतरही ऑर्डर आली नाही. जेव्हा आम्ही विचारले, तेव्हा कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली."

"कर्मचाऱ्यांचा उध्दटपणा!"

– आणखी एका ग्राहकाने म्हटले आहे, "हॉटेलमधील व्यवस्थापन पूर्णपणे बेजबाबदार आहे. तक्रार केल्यावर आम्हाला चक्क बाहेर जाण्यास सांगण्यात आले."

"साफसफाई अभाव आणि चुकीचे बिल!"

– काहींनी साफसफाईच्या कमतरतेवरही प्रकाश टाकला आहे. तसेच, बिलामध्ये जादा रक्कम लावण्याच्या तक्रारी वारंवार झाल्या आहेत.

प्रतिमेला मोठा फटका

या नकारात्मक रिव्ह्यूमुळे हॉटेलच्या प्रतिमेला मोठा फटका बसत असून, नवीन ग्राहक या हॉटेलला टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर या हॉटेलला "कधीही परत न जाण्याचे" सल्ले दिले आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत