शिवछत्रपतींचा झाकलेला पुतळा खुला करून दया
- सकमूर वासियांची मागणी, जिल्हाधिका-यांना निवेदन
- आमरण उपोषणाचा दिला इशारा
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर येथील नागरिकांनी गावातील चौकात बसविला.गावात याबाबत कुणाचाही विरोध नव्हता.पण गावातील एका व्यक्तीने प्रशासनाला हाताशी धरून हा प्रकार अनाधिकृत असल्याचे सांगीतले.यामुळे तालुका प्रशासनाने शिवाजी महाराजांचा पुतळा झाकला.दरम्यान प्रशासनानेच महाराजांची विंटबणा केली असा आरोप करित अशोक रेचनकर व गावक-यांनी आता जिल्हाधिका-यांना निवेदन दिले असून तातडीने झाकलेला पुतळा खूला करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे कि,शिवछत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत.त्यांचा आदर्श व जिवनचरित्र डोळयासमोर ठेउन नव्या पिढीला प्रोत्साहन मिळावे यासाठी सकमूर येथील गावक-यांनी नियोजीत जागेत पुर्णाकृती पुतळा बसविला.पुतळा उभा करण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे.यामुळे ती पूर्ण होणार नाही याबाबत शंका होती.अशात पुतळयासाठी गावात कुणाचाही विरोध नव्हता.गावातील इतर समाजबांधवांना देखील हा पुतळा बसविण्याबाबत कुठलीच हरकत नव्हती.यामुळे गावातील लोकांनी सर्वसंमतीने चौकात पुतळा बसविण्यासाठी सहभाग दर्शविला.
मात्र दिनांक 9 जानेवारी रोजी एका शिवद्रोही व्यक्तीकडून हेतूपुरस्पर प्रशासनाला हाताशी घेत सकमुर येथील बसविलेला पुतळा हा अनाधिकृत असल्याचे सांगण्यात आले.यानंतर प्रशासनाने शिवाजी महाराज यांचा पुतळा झाकला. व त्यांची विटंबणा केली असा आरोप निवेदनातून करण्यात आला. यादरम्यान लोकांनी प्रशासनाला पुतळा न झाकण्याची विनंती केली. पण प्रशासनाने जनमताचा आदर केला नाही. मनमानी करित परवागनीशिवाय पुतळा उभा करू दिला जाणार नाही अशी भुमिका घेतली. यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण गावक-यांनी संयमाची भुमिका घेत माघार घेतली. 98 गावांचा समावेश असलेल्या गोंडपिपरी तालुक्यात अंदाजे 40 पुतळे आहेत. यात नेमके किती पुतळे नोंदणीकृत आहेत असा प्रश्न निवेदनातून विचारण्यात आला. दरम्यान हा सारा प्रकार गावातील एकाने वैयक्तीक व्देषातून केला आहे. जनमताचा आदर लक्षात घेता सकमूर येथील शिवाजी महाराजांचा झाकलेला पुतळा खुला करावा अन्यथा 20 फेब्रुवारी पासून तहसिल कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यत गावकरी आमरण उपोषण करणार असल्याच इशारा गावक-यांनी दिला आहे.
प्रतिक्रिया :
सकमुर येथील समस्त गावकऱ्यांची जनभावना लक्षात घेता शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा झाकलेला पुतळा प्रशासनाने तातडीने खुला करुन द्यावा. अन्यथा आता आम्ही गावकरी आमरण उपोषण करणार आहोत. तालुक्यात असलेल्या किती पुतळे नोंदणी कृत आहेत. याकडे देखील प्रशासन लक्ष देणार का..?
- अशोक रेचनकर, अध्यक्ष शिव भीम एकता राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, सकमुर.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत