Nagpur Crime : पित्याला मारहाण करून फेकून दिले
Shocking Incident : इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बारासिग्नल परिसरात सुरक्षारक्षक मुलाने पित्याला मारहाण केली आणि पारडी येथे जखमी अवस्थेत फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली.
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, नागपूर : इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बारासिग्नल परिसरात सुरक्षारक्षक मुलाने पित्याला मारहाण करीत पारडी येथे जखमी अवस्थेत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गणेश शिवराम महिंद (वय ५५) असे जखमी वडिलांचे नाव असून राजेश गणेश महिंद (वय ३०) असे आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता.८) पोलिसांना ११२ क्रमांकावरून एक कॉल आला. त्यात एक वृद्ध पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धारगाव येथे जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली.
त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचे आढळून आले. त्यांना मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सुरक्षा रक्षक मुलाने मारहाण केल्याची माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत