महसूल खात्यातील गैरव्यवहाराची उचस्तरीय सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करा- सुदाम राठोड
महसूल खात्यातील गैरव्यवहाराची उचस्तरीय सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करा- सुदाम राठोड
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : जिवती महसूल कार्यालयात मागिल २०१७ पासून संजयगांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील मृत लाभार्थ्यांच्या नावाने कोट्यावधी रुपयांची हेराफेरी केल्याचे प्रकरण पुण्यनगरी वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचायला मिळत असून यात सत्यताही आहे, महसूल खात्यातील तत्कालीन तहसीलदार, लिपिक व संगणक परिचालक व बॅंकचे शाखा अधिकारी यांच्या हातमिळवणीतून संपूर्ण गैरव्यवहार करण्यात आले असून गैरव्यवहाराची रक्कम दिड कोटींच्यावर पोहोचली आहे.संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास शासकीय योजनेतील अनुदातील रक्कम हेराफेरीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे आहे.
मात्र प्रशासनाडून हे प्रकरण गंभिरतेने घेतले जात नाही, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात समिती नेमली,समितीने संपूर्ण चौकशी केली परंतु अहवालात काय निष्पन्न झाले अजूनही खुलासा केला नाही त्यामुळे चौकशी समितीवरच आता संशय वाटायला लागले आहे.खरे तर या गंभिर प्रकरणात तात्काळ चौकशी होऊन महसूल खात्यातील अनुदानाची हेराफेरी करणाय्रा दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी खटला दाखल करायला पाहिजे होते परंतु अजूनही प्रशासनामार्फत कुठलीही हालचाली दिसत नाही.शेतकय्रांना मिळणाऱ्या पिक नुकसानीच्या अनुदानातही गोलमाल झाल्याचे उघडकीस येत आहेत, अमृतमहोत्सवाचा निधी बोगस बिले जोडून जिरविण्यात आला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणे गरजेचे आहे.
करिता साहेब आपणास विनंती आहे की मि दिलेल्या अर्जाचा विचार करून महसूल खात्यात झालेल्या झोलझाल कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, तसेच तत्कालीन तहसीलदार, लिपिक, बॅंक मॅनेजर व संगणक परिचालकाची संपत्तीची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना शासकीय सेवेतून तात्काळ बडतर्फ करीत त्यांच्याकडे असलेली संपत्ती जप्त करण्यात यावी.असे निवेदन जिवती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे जिवती तालुकाध्यक्ष सुदामभाऊ राठोड यांनी तहसीलदारमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत