Breaking News

त्या रस्त्याच्या दर्जोन्नतीच्या कामात चोरीचे मुरूम, महसूल विभागाच्या आशीर्वादाने वापरला जात असल्याची खमंग चर्चा

रस्त्याचे काम बोगस दर्जाचे अभियंताचे दुर्लक्ष कंत्राटदार मालामाल, रस्त्याचे होणार बेहाल

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, हकानी शेख, चंद्रपूर : जिवती तालुक्यातील शेवटच्या टोकावर भारी बाबापुर या रस्त्याला लागून शेडवाही या गावाकडे जाणारा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत लांबी १.८५ कि.मी. रस्त्याचे काम सुरू असून या कामावर संबंधित अभियंताचे दुर्लक्ष असल्यामुळे बोगस दर्जाचे काम रस्त्याचे होत असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्याच्या कामावर अवैध मुरुमाच्या वापर करण्यात आला असल्याची परिसरातील जनतेला शंका निर्माण झाली आहे. 

\हायवा ट्रकच्या साह्याने रात्रीच्या वेळी मुरूम रस्त्याच्या कामाला टाकण्यात आले अशी चर्चा सुरू असून या अवैध मुरुमाची तस्करी करणारा कोण ?  चोरी करून मुरूम तस्करी करणाऱ्या वर महसूल विभाग, वन विभाग व तसेच पोलीस विभाग मेहरबान असणार का ?  कारण जोपर्यंत अवैध धंदे करणाऱ्या वर संबंधित विभाग मेहरबान राहत नाही तोपर्यंत अवैध धंदे करणारा हिम्मत करत नाही अशी सुज्ञ नागरिकाकडून बोलले जात आहे. लाखो रुपयाच्या शासनाला चुना लावण्याचा काम मुरूम चोर तस्कर करीत आहे व त्याला सहकार्य करणाऱ्या संबंधित विभागही तेवढाच दोषी असल्यामुळे हा मुरूम आला कुठून याची चौकशी केल्यावर मोठा राॅकेट हाती लागणार आहे. 

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम सुरू असून ते काम अंदाजपत्रकानुसार सुरू नसल्याचे दिसून येत आहे. खरंतर करारनामा नुसार काम सुरू करण्याचे दिनांक ०८/१२/२०२३ व काम पूर्ण करण्याचे दिनांक ०७/१२/२०२४ असे असून सुद्धा काम पूर्ण करण्याची करारनाम्याची तारीख निघून गेली आणि त्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आता हे काम घाई गडबडीने सुरू असून या कामावर संबंधित अभियंत्याच्या दुर्लक्ष असल्यामुळे काम अंदाज पत्रकानुसार करण्यात येत नसून निकृष्ट बोगस दर्जाचे काम सुरू आहे. 

अशाच प्रकारचे कामे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत जिवती तालुक्यात दोन वर्षा अगोदर कामे झाले आहे. निकृष्ट बोगस दर्जाचे काम झाल्यामुळे आज घडीला त्या रस्त्याचे दुर्जर हाल झाले आहे जागोजागी मोठमोठे खड्डे पडले गिट्टी पूर्ण पैकी उकडून रस्त्यावर पसरली आहे. करारनामा संपला काम उशिरा सुरू झाला आणि हा काम घाई गडबडीने  करण्यात येत आहे. म्हणून रस्त्याच्या कामाकडे  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन रस्त्याच्या कामाची चौकशी करावी. काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्यावर संबंधित देखरेख करणाऱ्या अभियंतावर व तसेच संबंधित कंत्राद्वारावर कारवाई करून रस्त्याचे गुणवंतपूर्वक काम करून घ्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत