Padoli Sexual Assault : वीटाभट्टीवर काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाने तीन वर्षीय चिमुकलीवर केला अत्याचार
Child Protection : पडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंचाळा गावाजवळ एका वीटाभट्टीवर काम करणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला.
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : एका वीटाभट्टीवर काम करणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला. ही घटना पडोली पोलिस ठाण्यांतर्गत पडोली-घुग्घुस मार्गावर असलेल्या चिंचाळा गावाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकलीचे आई-वडील एका गावाजवळच्या वीटभट्टीमध्ये काम करतात. शुक्रवारी (ता. ७) सकाळी ११ वाजता आई-वडील त्यांच्या मुलीला झोपडीत झोपवून कामावर गेले होते. तेव्हा तिथे काम करणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने मुलीला एकटे पाहून तिच्यावर अत्याचार केला.
मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून आई-वडील तातडीने झोपडीत पोहोचले. त्यांनी अल्पवयीन मुलाला पकडले. मुलीच्या आई-वडिलांनी पडोली पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला पकडून बाल सुधारगृहात पाठवले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (अ) आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव करत आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत