महसूल खात्यातील अधिकारीसह मृतक संगणक परिचालक याच्या मित्रमंडळीही अडचणीत येण्याची शक्यता
पोलिसांकडून कसून चौकशी, हेराफेरीची रक्कम वाढण्याची शक्यता
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी शेख हक्कानी चंद्रपूर/जिवती :- येथील महसूल खात्यातील हेराफेरी प्रकरणात महसूल खात्यातील अधिकारी गोत्या येण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू असून.मृतक संगणक परिचालक विकास राजेंद्र येलनारे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर जिवती पोलिसांकडून या हेराफेरी प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे महसूल खात्यातील हेराफेरी च्या रकमेच्या आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मृतक संगणक परिचालक विकास येलनारे यांच्या मित्रमंडळीही व तसेच महसूल खात्यातील काही अधिकारीही या प्रकरणाच्या गोत्या येण्याची शक्यता ना करता येत नाही आहे. अशी चर्चेला उदान आले आहे. महसूल खात्यातील हेराफेरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या अध्यक्ष खाली एक समिती नेमली होती. त्या समितीने चौकशी केली.
या हेराफेरी प्रकरणात अडचणीत येणाऱ्या तत्कालीन तहसीलदारांना वाचविण्यासाठी चौकशीत केवळ ३४ लाखांचा अपहार झाल्याच्या अहवाल वरिष्ठांना सादर केला असल्याचे बोलले जात आहे. मात्र जिवती पोलिसांनी मृतक संगणक परिचालक विकास राजेंद्र येलनारे यांच्यावरच फौजदारी कारवाई केल्यानंतर पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर यायला लागले आहेत. मृतक संगणक परिचालक विकास येलनारे यांनी योजनेतील लाभार्थ्यांच्या नावासमोर आपलेच खाते क्रमांक दाखवून ३ लाखांचा अपहार केल्याचे जिवती पोलीस तपासात निष्पन्न झाले.
यासोबतच जिवतीतील अनेकांच्या खात्यावर शासकीय योजनेतील मोठी रक्कम वळती झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.जिवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे या हेराफेरी प्रकरणात सखोल चौकशी करीत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. अशी पण चर्चा आहे की या हेराफेरी प्रकरणातून कसे बाहेर निघता येईल यासाठीही काहीजण वकिलाशी भेटीगाठी करीत असल्याची डबक्या आवाजात चर्चा केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत