गुडसेला येथे मा.ठाणेदार पांडे यांनी घेतली शांतता बैठक
गुडसेला येथे मा.ठाणेदार पांडे यांनी घेतली शांतता बैठक
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी शेख हक्कानी चंद्रपूर/जिवती :- गावात शांतता,सुव्यवस्था राखण्यासाठी गुडसेला गावातील महिला जिवती पोलिस स्टेशन ला भेट देऊन गावातील समस्या सांगितल्या.गावात अवैध देशी दारू दुकान सुरू असून सार्वजनिक हातपंप जवळ दारू विक्री सुरू आहे.आणि तेथे महिला पाणी भरण्यास जातात.यामुळे गावात अशांतता पसरली आहे.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन जिवती पोलीस स्टेशन चे ठाणेदार कांचन पांडे यांनी गुडसेला येथे गावातील नागरिकांची शांतता बैठक आयोजीत केली. कायद्यापुढे सर्व समान असून गावात अवैध धंदे आढळून आल्यास कार्यवाही होईल असे सांगितले.
गावात सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने नांदत राहतील आणि शांतता सुव्यवस्था राखून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे अशी आशा व्यक्त केले.त्यावेळी गावातील महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून गावात शांतता राखण्याची शपथ घेतली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत