Breaking News

अवैध देशी विक्रेत्याची गावात दबंगगिरी, महिला धडकल्या ठाण्यावर

 अवैध देशी विक्रेत्याची गावात दबंगगिरी, महिला धडकल्या ठाण्यावर 

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती :- तालुक्यापासून सुमारे पंधरा किमी अंतरावर असलेल्या गुडसेला या गावात मागील बऱ्याच दिवसापासून अवैध देशी दारू विक्री सुरू आहे.गावातील ज्येष्ठ व्यक्ती कडून दारू विक्रेत्यांना समजावून सांगितले असता ते ऐकत नाहीत.गावात अशांतता पसरली आहे.दारू चे दुकान हे सार्वजनिक हातपंप चे बाजूला असून तळीमार हे दुकानातून बॉटल घेऊन हातपंप वर येऊन दारू पितात.

तेथे महिला,मुली पाणी भरण्यास आलेल्या असताना त्यांना बाजूला व्हावे लागते.जर एखाद्या महिलेने तेथे दारू पिण्यास विरोध केला तर दारू विक्रेता म्हणतो की हा हातपंप माझ्या जागेत आहे.हातपंप करिता मी जागा दिली आहे.मी काही करू शकतो.माझ्या मालकीचा हातपंप आहे.असे म्हणत महिलांना अश्लील शिवीगाळ करतो.याच्या गुंड प्रवृत्ती मुळे कोणी महिला पुढे जात नाहीत.मात्र संसार दारूच्या पुरात वाहून जात आहे.आणि गावातील अल्पवयीन पिढी बिघडत जात आहे हे पाहून महिला पुढाकार घेऊन पोलिस स्टेशन जिवती येथे ठाणेदार यांना निवेदन देऊन ही अवैध देशी दारू बंद करण्याची विनंती केली.यावेळी गावातील मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत