Breaking News

इलेक्ट्रिक शार्टसर्किटमुळे जनावराच्या गोठयाला आग सात जनावरे आगीमुळे होरपडून जागीच ठार

 इलेक्ट्रिक शार्टसर्किटमुळे जनावराच्या गोठयाला आग सात जनावरे आगीमुळे होरपडून जागीच ठार

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर / वरोरा :- वरोरा तालुक्यातील बामर्डा पो. सोईट येथील संजय वासुदेव येडमे यांचा शेतातील जनावरांचा गोठ्याला काल रात्री इलेक्टिक शॉर्ट सर्किट मुळे आग लागून यामध्ये ३ दुधाच्या गाई, १ मैस व ३ वासरू जागीच आगीत होळपळून मरण पावले तर २ मैस , ५ गायी व २ वासर जखमी झाले आहे, रात्री झालेल्या या आकस्मिक घटनेने येडमे परिवारावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे, दरम्यान या घटनेची तक्रार पोलीस स्टेशनं येथे देऊन संबंधित कार्यालयाला माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा : कोरोना काळात बंद झालेली काजीपेठ रेल्वेगाडी पुन्हा सुरू!

काल झालेल्या या घटनेमुळे संजय येडमे यांचे अंदाजे किंमत ४ लाखांचे नुकसान झाले आहे तर १ लाख किमतीचा चाऱ्यांचे नुकसान असे मिळून एकूण ५ लाखांचे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी स्थानिक तहसीलदार तलाठी यांनी घटना पंचनामा महत्वाचा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत