कोरपणा बस स्टॉप येथे केजीएन तर्फे पाणपोई सुरू
कोरपणा बस स्टॉप येथे केजीएन तर्फे पाणपोई सुरू
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर/कोरपणा : उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मार्च महिन्याची सुरुवात होताच सूर्य आग ओकू लागला असून, नागरिक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर, तसेच लग्नसराई आणि माराई पाटण यात्रेच्या गर्दीचा विचार करून, केजीएन तर्फे कोरपणा बस स्टॉप येथे पाणपोई सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा : कोरोना काळात बंद झालेली काजीपेठ रेल्वेगाडी पुन्हा सुरू!
ही पाणपोई 6 मार्च रोजी गुरुवारी सुरू करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी मित्रमंडळी व स्थानिक युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणपोईमुळे प्रवाशांना, भाविकांना तसेच इतर नागरिकांना थंड आणि शुद्ध पाणी मिळण्यास मदत होणार आहे. उन्हाच्या झळांपासून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
हेही वाचा : शेतकऱ्यांना वेकोलीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनस्तरावर धोरण ठरवावे
या सामाजिक उपक्रमाचे स्थानिकांनी आणि प्रवाशांनी कौतुक केले असून, युवकांनी केजीएनचे आभार मानले आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे पुढील काही महिन्यांत अशा सेवा अधिक गरजेच्या ठरणार आहेत. त्यामुळे सामाजिक संस्थांनी आणि इच्छुक नागरिकांनी पुढाकार घेत पुढे येण्याची गरज आहे.
बातमी संकलन : संतोष मडावी



कोणत्याही टिप्पण्या नाहीत