वरूर रोड गावातील बोगद्याच्या (अंडरपास) मागणीसाठी गावकरी उतरले रस्त्यावर
ग्रामपंचायत सह नागरीकांचे प्रशासनासोबत आमदार देवराव भोंगळे यांना दिले निवेदन
भव्य आंदोलन मोर्चा समिती अधिक आक्रमक
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर/राजुरा :- वरूर (रोड) गावामध्ये जी.आर. कंपनी द्वारे रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र या रस्त्याच्या दुतर्फा भिंती उभारल्या गेल्यामुळे गाव दोन भागांमध्ये विभागले गेले आहे. त्यामुळे गावातील नागरिक, विद्यार्थी, जनावरे, आणि सर्वसामान्य लोक यांना रस्ता ओलांडण्यासाठी ३० मीटर एवजी ७००-८०० मीटर लांब पायपीट करित जावे लागणार आहे. ज्यामुळे नागरिक, विध्यार्थी व जनावरांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागेल. त्यामुळें वरूर् रोड ग्रामस्थांनी या समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यांना , उपविभागीय अधिकारी राजुरा, तहसीलदार राजुरा व राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांना ही निवेदन दिले . परंतु त्यावर कोणताही ठोस तोडगा काढला गेलेला नसल्याने शेवटी ग्रामपंचायत सह संतप्त गावकरी रस्त्यावर उतरल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले.
हेही वाचा : मराठी भाषेचा गौरव व संस्कृतीचा अभिमान "मराठी भाषा गौरव दिन साजरा"
गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरत आपल्या मागण्या लावुन धरल्या. बांधकाम सुरू ठेवले जात आहे. त्यामुळे टेंबूरवाही ते भेदोडा फाटा ते साखरवाही फाटा या दरम्यान योग्य ठिकाणी बोगदा (अंडरपास) तयार करावा ही गावकऱ्यांनी मागणी केली आहे. यासाठी भव्य आंदोलन मोर्चाचे आयोजन दि. ३ मार्च सोमवारला सकाळी ९ वाजता बस स्टॉप वरूर (रोड) येथे कऱण्यात आलें. यावेळी गावातील सर्व नागरिकांनी, युवक,आणि ज्येष्ठ मंडळीं या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होते. विकास व्हावा परंतु स्थानीक गावकऱ्यांना त्याचा त्रास होत असेल तर त्यावर प्रशासनाचे योग्य तोडगा सुद्धा काढला पाहिजेत असे भव्य आंदोलन मोर्चा समिती, वरूर (रोड) यांचें म्हणणे आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत