Breaking News

महसूल विभागाच्या आशीर्वादाने भद्रावती तालुक्याचे रेती तस्कर जोमात

मात्र,चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळू चोरट्यांना गोपनिय माहितीच्या आधारे जेरबंद केले.

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर :- रेती चोरी प्रकरणातंर्गत तरुण युवक जास्त प्रमाणात असल्याचे कारवाई दरम्यान लक्षात आले आहे.सध्यास्थित कामधंदा म्हणजे रेतीचोरी असे समीकरण झाले असून गावातील लोकांची झोप उडवून रेती चोरी करण्याचा प्रकार भद्रावती तालुक्यात सर्रास सुरू आहे.रेती चोरीवर आळा बसण्याकरीता सबंधित प्रशासनाला प्रसार माध्यमातून माहीत देण्यात आली “पण” कारवाई कशाची? या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना गोपनिय माहीती मिळाल्यावरून येथील कर्तव्य दक्ष पथकांनी भद्रावती हद्दीतील मौजा चारगांव परिसरातून अवैधरित्या रेती चोरून वाहतुक करीत असल्याचा मिळालेल्या माहीतीनुसार सापळा रचला असता चोरटे सापळ्यात अडकले.

हेही वाचा : वरूर रोड गावातील बोगद्याच्या (अंडरपास) मागणीसाठी गावकरी उतरले रस्त्यावर

त्यांचा कडून रेती भरलेले ट्रॅक्टरसह एक ब्रास रेती जप्त केली.सापळ्यात सापडलले आरोपी १) अमोल पोटे ट्रॅक्टर मालक (वय ३२ वर्ष रा. भद्रावती), २) गणेश संतोष ठाकरे (वय २७ वर्ष रा. चारगांव तह. भद्रावती) यांचे विरुद्ध भद्रावती पोलिस स्टेशन अंतर्गत अप. ५५/२०२५ कलम ३०३ (२) भा. वा. सं. सहकलम १७७ मो. व. अ. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची पोलिसांनी माहीत दिली. 

हेही वाचा : पोलिसांच्या आशीर्वादाने रात्री हायवा ट्रकद्वारे सर्रासपणे रेती आणली जात असल्याची तालुक्यात चर्चा

सदर कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू,यांचा मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे,यांचा नेतृत्वात साहय्यक पोलिस निरीक्षक बलराम झाडे,पोलिस उपनिरिक्षक संतोष निंभोरकर,नापोअ संतोष येलपुलवार,नितीन रायपूरे, मिलिंद जांभळे,गणेश भोयर, प्रमोद कोटनाके यांच्या मार्गदर्शनात पार पाडण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत