सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याच्या कडेला लावलेली झाडे अल्पावधीतच वाळले
दोषींवर कारवाई होणार का?
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर :- वातावरणाआतील ऑक्सिजनचा पुरवठा हा दिवसेंदिवस कमी होत असल्याने शासकीय स्तरावर वृक्ष लागवडीचे प्रयोग अनेक उपक्रमच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागांनी रस्त्याच्या कडेला दुतर्फा वृक्ष लागवड करीत आहे. दहाफुट वाढलेली जिवंत झाडे रस्त्याच्या बाजूला लावण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने एका कंत्राटदार कंपनीच्या मालकाला दिलेले आहे.मात्र ती रस्त्याच्या कडेला लावलेली जिवंत झाडे अल्पावधीतच सुकलेल्या अवस्थेत दिसून येत असल्याने वाटसरूंना या झाडाची सावलीचा उपयोग कधी होणार असा सवाल पादचाऱ्यांना पडला आहे.त्यामुळे झाडाचे संगोपन करणाऱ्या कंत्राटदारवर सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई करणार? की घाबरू नकोस!मी तुझा पाठीशी आहे असा आशीर्वाद देणार याकडे पादचारी वर्गाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : महसूल विभागाच्या आशीर्वादाने भद्रावती तालुक्याचे रेती तस्कर जोमात
सावली तालुक्यातील उसेगाव ते साखरी पर्यंत १७३०झाडे लावण्याचे कंत्राट कहाळे इन्फ्राकान कंपनी प्रायवेट लिमिटेड कडे दिलेले आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे आवारात ११६ झाडे लावण्यात आली आहेत.या कंपनीने ४०प्रकारची वड, आंबा, चिंच, पिंपळ सारखी झाडे लावायची आहेत. अंदाजे एका झाडावर २हजार रुपये खर्च असल्याचे ऐकिवात आहे.देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम सदर कंपनीला करायचे आहे. झाडे लावून झाली आहेत.कंत्राटदार मजुरांच्या हाताने पाणी टाकण्याचे काम करीत आहे.परंतु उन्हाळा सुरू झाल्याने खड्डात लावलेली झाडे सुकायला लागली आहेत.
ज्या उद्देशाने ही झाडे लावण्यातआली आहेत.त्या मूळ उद्देशाला तिलांजली देण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. आताच या वृक्ष लागवडीला अखेरची घरघर लागल्याचे दिसून येत आहे.झाडे लावण्याचे कंत्राट संमधीत विभागाचे अधिकाऱ्यांनी मर्जीतील लोकांना अप्रत्यक्षपणे दिले जात असल्याची ओरड अनेक जाणकारांनी केली आहे.त्यामुळे आर्थिक जोखीम सांभाळून हा खेळ खेळण्यासाठी कल्पनाही दिली आहे. या विभागांनी मागील वर्षातही अनेक कंत्राटदारांना वृक्ष लागवडीसाठी कामे दिली. परंतु आजघडीला त्या झाडाचे संगोपन झाले नाही.त्यामुळे देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे साहजिकच होत आहे.वृक्षाचे संगोपन होत नसल्याने वृक्षलागवडकेवळ एक फार्स ठरत आहे.गतवर्षी लावलेल्या झाडाची व जिवंत झाडाची आकडेवारी काढली तर सार्वजनिक बांधकाम विभागाला लाजिरवाणी बाब ठरत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत