Breaking News

गोंडपिपरीत राजकीय भूकंप! शेतकरी संघटना व काँग्रेसचे प्रमुख नेते भाजपमध्ये दाखल

विकासाला मिळणार नवा वेग – आमदार भोंगळे

गोंडपिपरीत राजकीय भूकंप! शेतकरी संघटना व काँग्रेसचे प्रमुख नेते भाजपमध्ये दाखल

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी शेख हक्कानी, चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली असून, आज पोंभुर्णा येथे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरात मोठा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी संघटनेचे आजी-माजी सरपंच व काँग्रेसचे अनेक सक्रिय कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात सहभागी झाले.

नवीन प्रवेश करणाऱ्यांमध्ये पानोरा गावचे सरपंच जनार्दन ढुमणे, चेकपारगांवच्या सरपंचा मनिषा निखाडे, माजी सरपंच बंडू गिरसावळे यांचा समावेश आहे. तसेच काँग्रेस पक्षातील लाठी येथील देवराव मरसकोल्हे, पारडीचे सुरेश मडावी, संतोष पचारे, संदीप पचारे, सरांडीचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता वारलू मेश्राम, रमेश जगताप, संजय घोडाम, भिवसेन कोटनाके, आनंदराव कोटनाके, लक्ष्मण चिंचोलकर व विजय भोयर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

"सर्वांच्या सहकार्याने गोंडपिपरी तालुका विकासाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करणार," असा विश्वास आमदार देवराव भोंगळे यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी नवप्रवेशितांचे स्वागत करत त्यांच्या सहभागामुळे पक्ष अधिक बळकट होईल, असेही सांगितले.

या भव्य कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष दीपक सातपुते, माजी जि.प. सदस्य अमर बोडलावार, भाजपा महिला मोर्चाच्या महामंत्री कु. अल्काताई आत्राम, नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, शहराध्यक्ष चेतनसिंह गौर, अर्चना भोंगळे, विजय शेरकुरवार, राकेश पुन, कोमल फरकाडे, अरुणा जांभुळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत