भाईपठार वासियांना रस्त्याची प्रतिक्षा अपूर्ण रस्त्याची वाढीव मंजुरी करून रस्ता पूर्ण करून द्यावा गावकऱ्यांची मागणी
अपूर्ण रस्त्याची वाढीव मंजुरी करून रस्ता पूर्ण करून द्यावा गावकऱ्यांची मागणी
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी शेख हक्कानी, चंद्रपूर, जिवती:- ग्रामीण भागातील विकासात रस्त्याची भुमिका फार महत्त्वाची मानली जाते, शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रस्ते खडतर व दुर्लक्षित असल्याने ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
जिल्ह्यात दुर्गम व मागास अशी ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील तालुका मुख्यालया पासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात वसलेल्या भाईपठार गावात सत्तर घरांची वस्ती चारशेच्या जवळ लोकसंख्या आहे.
आठवडी बाजार व आरोग्यविषयक समस्यांसाठी त्यांना विस किलोमीटर अंतरावरील पाटण येथे यावे लागते, दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला रस्ता पुर्णतः उखळला असल्याने नागरिकांना खडतर प्रवास करावा लागत आहे गावात शासनाची लाल परी पोहचत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला रस्ता अपुर्णच.
भाईपठार ते पाटण हा रस्ता लांब व खडतर असल्याने गावकऱ्यांनी भाईपठार ते जंगुगूडा हा सुमारे तीन किलोमीटर अंतर असलेला बनविण्यासाठी मागणी केली तीन वर्षांपूर्वी एक किलोमीटर पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाले मात्र पुढील दोन किलोमीटर अंतरावरील काम रखडले आहे त्यामुळे या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी गावकऱ्यांनी राजुरा विधान सभेचे आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भाईपठार ते जंगुगूडा हा रस्ता चंद्रपूर - आसिफाबाद महाराष्ट्र तेलंगणा राज्य महामार्गाला जोडतो त्यामुळे हा कमी अंतराचा रस्ता नागरिकांसाठी आरोग्यविषयक समस्या, शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सोयीचा होईल यासाठी या रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत