Breaking News

आकार कॉलेज हिंगणा येथे जागतिक युवा कौशल्य दिन संपन्न


महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, हिंगणा : आकार बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था नागपूर द्वारा संचालित आकार कॉलेज हिंगणा येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र अंतर्गत जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी जिल्हा कौशल्य कार्यालय नागपूर येथील प्रकल्प समन्वयक श्री कुणाल पवार उपस्थित होते.

या कार्यक्रमात महाविद्यालयातिल विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारित पोस्टर पेंटिंग, निबंध तयार केले. या कार्यक्रमात संस्थेचे प्रकल्प समन्वयक रितेश सहारे,  प्राध्यापक सौ प्रितमा ढाले,सौ कांचन अठवाल ,सौ मानसी शर्मा,सौ पुजा राणे,सौ मयुरी सलोकर तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत