भाजपा कामगार मोर्चा तालुका अध्यक्ष सौरभ हरिश्चंद्र गिरसावळे यांच्या नेतृत्वाखाली विसापुर ग्रामपंचायत ला खांबावरील बंद पथ दिवे सुरू करून देण्यात यावे अशी मागणी.
भाजपा कामगार मोर्चा तालुका अध्यक्ष सौरभ हरिश्चंद्र गिरसावळे यांच्या नेतृत्वाखाली विसापुर ग्रामपंचायत ला खांबावरील बंद पथ दिवे सुरू करून देण्यात यावे अशी मागणी.
महा घडामोडी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर:बल्लारपूर तालुक्यातील भरपुर मोठी लोकसंख्या असणाऱ्या विसापुर गावामध्ये मोठ्या प्रमाणात खांबावरील पथ दिवे बंद असल्यामुळे होणारा त्रास लक्षात घेता भाजपा कामगार मोर्चा प्रदेश महासचिव श्री अजय भैय्या दुबे,भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव श्री.मिथिलेश भैय्या पाण्डेय,भाजपा युवा मोर्चा जिल्हा महासचिव श्री संदीप जी पोडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कामगार मोर्चा तालुका अध्यक्ष श्री सौरभ हरिश्चंद्र गिरसावळे यांनी विसापूर ग्रामपंचायत ला निवेदना द्वारे मागणी करण्यात आली आहे. की गावातील खांबावरील पथ दिवे बंद असल्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना सायंकाळच्या सुमारास येण्या जाण्यास त्रास होऊन राहला आहे तरी ही बाब लक्षात घेऊन ते लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थित आमिनजी शेख, तेजसजी घटे, रवीजी हरणे,साईनाथजी हिंगाणे, अतुलजी बावणे, गुलाबजी टोंगे, विजयजी चौधरी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत