सरपंच, उपसरपंच सहीत माथाडीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची आमदार देवराव भोंगळे यांची ग्वाही!
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी शेख हक्कानी, चंद्रपूर, जिवती : तालुक्यातील मरकागोंदी ग्रामपंचायतीत सामील असलेल्या माथाडी येथे काल दि. (०४) काँग्रेसच्या सरपंच दुर्पताबाई सिडाम, उपसरपंच लाला शेख यांचेसह ग्रामपंचायतीचे सदस्य आणि अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपचा सर्वसमावेशक लोककल्याणकारी विचार हा एकमेव पर्याय असल्याचा विश्वास व्यक्त करीत कार्यकर्त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला. या सर्व नवप्रवेशितांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा टाकून आमदार देवराव भोंगळे यांनी त्यांचे भाजप परीवारात स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना आमदार भोंगळे यांनी सांगितले की, समाजाच्या सर्व स्तरांमध्ये प्रगती घडवून आणण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असते त्यामुळे सर्वांनी जनसेवेस समर्पित अशी भूमिका घेऊन काम करणे अपेक्षित आहे.
पुढे बोलताना, भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर तसेच विकासाभिमुख धोरणांवर प्रेरित होऊन आज ज्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला, त्यांच्या विश्वासाला खरे उतरण्यासाठी आपली जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी लोकसेवेला प्राधान्य देऊन काम करा, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, तालुकाध्यक्ष दत्ता, गोविंद टोकरे राठोड, राजेश राठोड, अशपाक शेख, हनुमंत जागाये, आनंद कदम, वजीर सय्यद ,संतोष एकलारे, भीमराव पवार, चंद्रकांत घोडके, दिगांबर आंबटवाड, बालाजी माने, अजय खंडारे, मुन्ना शेख आदिंसह स्थानिक भाजपा पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत