Breaking News

विजेचा अनागोंदी लपंडाव विज बिल वसुली जोमात, महावितरण कोमात जनता अंधारात

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : महावितरणकडून विद्युत ग्राहकांना चोविस तास वीज उपलब्ध व्हावी, अशी नागरिकांना अपेक्षा असते. परंतु जिवती तालुक्यातील वेळीअवेळी वीज पुरवठा खंडीत हाेत असल्याने वीज ग्राहकांचा मागील अनेक दिवसांपासून अपेक्षाभंग होत आहे. मात्र याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे, रीडिंग पेक्षा विज बिल जास्तीचे येत असून. वीज मीटर मध्ये कसल्याही प्रकारचा फाल्ट नसून वीज मीटर फाल्टी असल्याचा आणि मागील रीडिंग उपलब्ध नसल्याचा बिलावर नमूद असते त्यामुळे ग्राहकांना विनाकारण महावितरण कार्यालयाची अनेक चकरा मारावे लागते मात्र महावितरण कार्यालयाच्या वतीने केव्हाही ग्राहकांना समाधान उत्तर मिळत नसल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे वीज बिलाची मात्र सुलतानी वसुली जोमात सुरू असल्याचे बोलल्या जात आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. काही दिवसात नवरात्राेत्सवही साजरा हाेणार आहे. या सण, उत्सवात विजेचा असा खेळखंडोबा सुरू राहिला, तर तालुक्यातील नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागणार आहे. एखाद्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर शहरासह तालुक्यातील अनुचित घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने शहरासह तालुक्यातील वीज पुरवठा खंडित होणार नाही, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे मात्र तालुक्यातील लाईनमेन आधी फाल्ट  न पहाताच काहीतरी बहाने करून नागरिकांना अंधारात ठेवण्याच्या गटकारस्थान केला जात असल्याचे जनतेने आरोप केले आहे. वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का अशी मग मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत