Breaking News

तालुक्यातील हजारो आदिवासींचा संतप्त सहभाग – आरक्षणातील अन्यायाविरोधात एकजूट

सरकारविरोधी घोषणांनी शहर दणाणले  तालुक्यातील हजारो आदिवासीचा सहभाग

आदिवासीचा हक्कात आड येणारे राजकर्त्यांना घरचा रस्ता दाखवू असे आदिवासी बांधवानी संताप व्यक्त केले.

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : मराठा समाजाच्या मुंबई आंदोलनादरम्यान सकल मराठा बांधवांसाठी हैद्राबाद स्टेट गॅझेटिअर (१९२०) लागू करण्याचे शासनाने आश्वासन दिले होते. याच धर्तीवर, बंजारा व इतर  समाजाला अनुसूचित जमाती (ST) आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे आदिवासी समाजात तीव्र संतापाचे  वातावरण निर्माण झाले आहे. आदिवासीचे घटनात्मक  आरक्षण कायम ठेवावे आणि महाराष्ट्रातील आदिवासी

 ( अनुसूचित जमाती) आरक्षणामध्ये बंजारा अथवा इतर कोणताही जाती समूहाला समाविष्ठ करण्यात येऊ नये या मागणी करिता  तालुक्यातील गाव पाटील यांचे नेतृत्वाने जंगोम जन आक्रोश मोर्चा काढत  आक्रोश व्यक्त करत आहे.

“आमचं आरक्षण आमचं राहू द्या”, “खोटं आदिवासीखतं, मान्य नाही”, “आदिवासींवर अन्याय बंद करा” अशा घोषणांनी शहराच्या मुख्य चौकात वातावरण ढवळून निघालं. या मोर्च्याने  नागरिक व प्रशासनाने लक्ष वेधून घेतले. 

अनुसूचित जमातीच्या घटनात्मक सवलतीवर गदा आणण्यासाठी बोगस जातींना आदिवासीचे सवलती देण्याचे षडयंत्र सरकारने सुरू ठेवले.याचा निषेध व आदिवासी आरक्षण वाचविण्यासाठी सर्व गाव पाटील व तालुक्यातील हजारो आदिवासी बांधवांनी जंगोम एल्गार महामोर्चात सहभागी घेतला.

मोर्चाच्या  प्रमुख मागण्या :- 

महाराष्ट्रातील आदिवासीच्या (अनुसूचित जमाती) आरक्षणामध्ये बंजारा अथवा कोणत्याही जातीचा समावेश करु नये. २. जिवती तालुक्यातील वनक्षेत्रातील समाविष्ठ असलेलीy आणि निर्वणीकरण झालेली क्षेत्र वनक्षेत्रातुन वगळण्यात आली त्याची पुणर्मोजणी करुन जुन्या अभिलेख नुसार नोंद घ्यावी  ३. जिवती तालुक्यातील आदिवासींना महसुल विभागाने दिलेल्या व निजामकालीन शासनाने सर्व आदिवासी दिलेल्या पट्ट्यांची पुर्णर्मोजणी करुन ज्या ज्या आदिवासींचा नावे आहे त्या आदिवासीचा वारसांना देण्यात व जुन्या गावठाण हद्द निश्चित करून तालुक्यातील सर्व गावांची सीमांकन करुन देण्यात यावा. ४. राज्य सरकारने ५ सप्टेंबर २०२५ चा अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील सरळसेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत शासन निर्णय रद्द करण्यात यावा. ५. अनुसूचित जमाती करीता ७.५% ऐवजी १५% सरसकट आरक्षण देण्यात यावा.या मुख्य मागण्यांसह हा अन्य मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिवती तालुक्यातील आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती व तालुक्यातील विविध  आदिवासी सामाजिक संघटनेचे नेतृत्व दुपारी 12 वाजता वीर बापूराव शेडमाके चौक पासून  तहसील कार्यालयसमोर जंगोम एल्गार महामोर्चा काढण्यात आला.

वीर बाबुराव शेडमाके चौक पासून मोर्चेला सुरुवात झाली. शहरातील मुख्य मार्गाने नारेबाजी करत हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर धडकले. मा.तहसीलदार जिवती  यांचे मार्फत मा.महामहीम  द्रोपती मुर्मूजी. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री ,महसूल मंत्री व अन्य संबंधितांना  निवेदन देण्यात आले आहे. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

यावेळी मोर्च्याकऱ्यांना अनेक मान्यवरांनी संबोधित करताना समाजाच्या व्यथा मांडल्या व समाज बांधवांनी पुढच्या संघर्षासाठी सदैव जागृत राहण्याचे आवाहन मा. भिमराव पाटील मडावी, मा.गजानन पाटील जुमनाके यांनी केले.

आदिवासी समाजाला राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. मूळनिवासी असलेल्या आदिवासींना संविधानिक न्याय हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी अन्यायकारक नियम तयार करण्याचे धोरण सरकार राबवत आहे. परिणामी हा समाजाला विकास पासुन कोसो दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मंगाम यांनी केला आहे.

ST आदिवासी  प्रवर्गाला संविधानाने 7  टक्के आरक्षण दिले आहे. स्वतंत्र्याच्या   75 वर्षेनंतरही सोयीसुविधा, विकासापासून वंचित असलेल्या हा समाज आरक्षणाच्या  माध्यमातून आता कुठे उभा राहून पाहात आहे मात्र यालाही दुष्ट लावण्याचा त्यांचा संविधानिक हक्क, अधिकारापासून वंचित ठेवण्याचा काही  संधी साधू समाज व ढोंगी राज्यकर्ते  करीत आहेत. आजचा हा संघर्ष जंगोम महामोर्चा आमच्या अस्तित्वाचा व अस्मितेचा असल्याने अशा संधी साधूना घरचा रस्ता दाखवू  असे  असे आव्हान महामोर्चाला संबोधित करताना आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचे सचिव कंटु कोटनाके यांनी केले.

यावेळी मोर्च्याचे  भोजू पा. आत्राम, सत्तरशाह पा. कोटनाके, भिमराव मेश्राम,बाजीराव वलका, शामराव गेडाम, भिमराव पा. जुमनाके, नामदेव जुमानके, प्रभाकर उईके, मारू पा. नैताम, शंकर वेट्टी,झाडू कोडापे, सोनेराव पेंदोर, हनुमंत कुमरे, गोविंदराव कुमरे, तुकाराम धुर्वे, सोमाजी सिडाम, चैनराव मडावी, आनंदराव शेडमाके, लचू मडावी, आनंदराव मडावी, सुरेश कोडापे, मारोती सिडाम, इस्तराव आत्राम, दादाराव टेकाम, शामराव सलाम, बापूराव आत्राम, जैतू कुळमेथे, पसरराम वेलदी, सागर कोटनाके (सरपंच), जंगू कोटनाके ( सरपंच), शामराव गेडाम, इसरू मेश्राम, सातलाबाई   जुमनाके, अनिता धुर्वे, सपना कोटनाके, मीरा सिडाम, रंजना जुमनाके, लक्ष्मीबाई जुमनाके, 

कृती समितीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मंगाम, संचालन :-  कृती समितीचे सचिव कंटु कोटनाके, आभार :- कोषध्यक्ष सिताराम मडावी (सरपंच पाटण), अर्जुन रायसिडाम, लिंगोराव सोयाम समितीचे सल्लागार, संतोष सलाम, शित्रू गेडाम, लचू वलका, मोहन आत्राम, केशव कुमरे, यशवंत मेश्राम, सागर कोटनाके, विजया जुमानके, संजय मडावी, रुपेश गेडाम, निलेश आत्राम, धर्मा आत्राम, मोतीराम सिडाम व तालुक्यातील युवक युवती आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत