Breaking News

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत कोरपना येथे विकासकामांचा आढावा

खताची टंचाई, निकृष्ट रस्ते आणि अपूर्ण कामांवर महत्त्वपूर्ण बैठक

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : कोरपना येथील तहसील कार्यालयात आज खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध ज्वलंत प्रश्नांवर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत स्थानिक नेते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा करून त्यांच्या निराकरणासाठी तातडीने उपाययोजना करण्याचा सूचना करण्यात आल्या.

जिल्ह्यात सध्या खताची तीव्र टंचाई असून, विशेषतः युरिया उपलब्ध नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून देण्यात आली. ऑनलाईन अर्जांमध्ये कागदपत्रांच्या साईजची मर्यादा असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असून, कृषी सहायकांनी यावर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

विकासकामांच्या स्थितीवरही सकारात्मक चर्चा झाली. पॉवर हाऊस ते नंदाफाटा पर्यंतचे काम अद्याप अपूर्ण असून, कोरपना तालुक्यातील रस्त्यांचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. घरकुल धारकांना जवळच्या घाटातून रेती उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच, अनेक अपूर्ण बांधकामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय, बँक ऑफ इंडियामध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. या सर्व समस्यांवर बोलताना खासदार प्रतिभा धानोरक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत