Breaking News

मा. श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार अपंग महिलांना व्हीलचेअर देऊन जगण्याला नवा आधार दिल्या बदल मनःपूर्वक आभार

मा. श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार अपंग महिलांना व्हीलचेअर देऊन जगण्याला नवा आधार दिल्या बदल मनःपूर्वक आभार

भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. संदीप भाऊ पोडे यांच्या मागणीला यश

महिलां दिन कार्यक्रमात भाजपा वरिष्ठ नेत्या सौ. अंजली ताई पंदीलवार, विद्या ताई दिवाळकर, शशिकला ताई जिवणे, यांच्या हस्ते वितरण

महा घडामोडी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर: दिव्यांग बांधवांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने ३ दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. हा सामाजिक उपक्रम मा. श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कडे भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ पोडे यांनी मागणी केली होती. ही मागणी संदीप पोडे यांनी आदरणीय भाऊंनकडे भाजपा कार्यकर्त्या समीरा पठाण जी, शशिकला जिवणे व करण जी कुमले यांच्या मागणी नुसार आदरणीय भाऊंनकडे केलेली होती व भाऊंनी ती मागणी पूर्ण केली. 

विसापूर मधील भाजपाचे वरिष्ठ नेते श्री. किशोर जी पंदीलवार यांच्या मार्गदर्शनामध्ये महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सौ.अंजली पंदीलवार, सौं.विद्या देवाळकर, विद्या गेडाम व अर्चना टोंगे , सुरेखा ताई टँकर,कविता ताई डाहुले, विद्याताई गेडाम, यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनात हालचालीसाठी मदत मिळावी आणि त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे हा होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, समाजातील दुर्बल व गरजू घटकांना मदत करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. अशा उपक्रमांमुळे दिव्यांग बांधवांना नवी उभारी मिळते आणि त्यांना समाजात आत्मविश्वासाने वावरता येते.

या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते. महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानाबरोबरच समाजातील दिव्यांग बांधवांप्रती संवेदनशीलता दाखविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या उपक्रमामुळे लाभार्थी दिव्यांग व्यक्तींना मोठा आधार मिळाला असून त्यांनी आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यातही समाजातील गरजू लोकांसाठी अशा प्रकारचे आदरणीय भाऊंच्या मार्फत मदतीकरिता सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प संदीप पोडे यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत