Breaking News

महाराष्ट्र ग्रामीण बँकेत ग्राहकांचा अपमान करणारा तो शुभम कोण ?

 महाराष्ट्र ग्रामीण बँकेत ग्राहकांचा अपमान करणारा तो शुभम कोण ?

महा घडामोडी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर:[कोरपना प्रतिनिधी ] चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगाना सीमा टोकेवर असलेल्या शहरांमध्ये ग्रामीण क्षेत्रातील ग्राहकासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक ही शाखा कोरपना येथे कार्यरत असून या ठिकाणी अनेक शेतकरी व व्यापाऱ्यांची खाती आहेत मात्र या ठिकाणी ग्राहकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होत नसल्याने अनेक ग्राहकांनी या बँकेतून आपले खाते बंद करून इतर बँकेमध्ये वळते केले आहेत ग्रामीण बँक मध्ये शुभम नावाचा एक कर्मचारी कार्यरत असून ग्राहकांशी अपमान जनक वागणूक करत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत ग्राहकांना केवायसी करताना हे कागदानाचे कागद आणा आज होणार नाही उद्या होणार उद्या नाही परवा या अशा प्रकारचे अनंत बहाणे करून ग्राहकांना त्रास करतो यामुळे अनेक महिला भगिनी व शेतकऱ्यांनी या बँकेच्या शुभम नावाच्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली असून बँकेने ग्राहकांशी कसे वागावे याबद्दलची शिस्त शुभम नावाच्या कर्मचाऱ्याला शिकवणे गरजेचे आहे एखाद्या व्यक्तीचे आडनाव आधार कार्ड पॅन कार्ड असताना सुद्धा तुमच्या चेकवर आडनाव समोर लिहिले आहे यावरून ओळख पटत नाही असे कारण सांगून थट्टा करण्याचे काम हा कर्मचारी करीत आहे ग्राहकांनी सर्व ओळखपत्र दिल्यानंतर व बँकेत हजर असलेल्या ग्राहकांनी ओळख दिल्यानंतर सुद्धा हा कर्मचारी अरेरावीची भाषा ग्राहकाशी करतो बँकेचे व्यवस्थापक यांनी याबाबत यामध्ये काही फार मोठी अडचण नाही आधार कार्ड पॅन कार्ड व चेक यामध्ये आडनाव मागे पुढे झाले असेल तरी ओळख पटवल्यानंतर त्यांना उचल देणे अभिप्रेत आहे असे सांगितले असताना सुद्धा हा मुजर व ग्राहकांशी व शेतकऱ्यांशी अपमान जनक वागणूक देणारा ह शुभम मी हे चेक वटवणार नाही म्हणून ग्राहकांशी उद्धट वागणूक देतो या कर्मचाऱ्याला बँकेचे नियम व ग्राहकांशी सेवा देण्याची याबद्दलची शिस्त निर्माण करण्याची गरज असल्याने बँकेच्या जिल्हा मुख्यालयी व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून याबाबतची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आबिद अली यांनी केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत