महावितरणाचा अनागोंदी कारभार
ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज
माहा घडामोडी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर:जिवती तालुका हा समस्येच्या माहेरघर असे संबोधने योग्यच ठरणार? महावितरण उपविभागीय कार्यालय जिवती येथे तालुक्यातील अनेक ग्राहकांचे घरगुती वीज मीटर, व्यावसायिक मीटर, शेतकऱ्यांच्या वीज मीटरची समस्या, रीडिंग पेक्षा जास्त बिल येने, काही ग्राहकांचे रीडिंग न घेणे, वीज मीटर ग्राहकाला पूर्व सूचना न देता विद्युत कनेक्शन कापणे, ग्राहकाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे.असे अनेक समस्याच्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात येते. ग्यानोबा तुळशीराम बेडदे रा. रहापल्ली या ग्राहकांनी महावितरण उपविभागी कार्यालय जिवती येथे दि.९/१२/२०२४ रोजी तक्रार दिली तक्रारीत असे नमूद केले की. माझे घरगुती वीज मीटर मध्ये बिघाड आलेला आहे. ते वीज मीटर बदलून नवीन वीज मीटर देण्यात यावे. अशी विनंती संबंधित अधिकाऱ्याकडे केली असता. संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित अर्जदाराला तोंडी सांगितले की आपला बिघाड झालेला वीज मीटर बदलून मिळणार परंतु त्यासाठी आपल्याला डिमांड रक्कम भरावी लागणार, संबंधित तक्रारकरत्यांनी दि.३०/१२/२०२४ रोजी डिमांड ची रक्कम ९७० रुपये रीतसर भरले. मात्र एक वर्ष लोटून सुद्धा बिघाड झालेला वीज मीटर बदलण्यात आले नाही व नवीन वीज मीटर लावण्यात आले नाही. म्हणून संबंधित अर्जदारांनी दि.१३/३/२०२६ रोजी परत अर्ज केला. आणि अर्जात विनंती केली मी वारंवार आपल्या कार्यालयाचे चकरा मारत आहोत आणि आपण माझ्या विनंतीकडे दुर्लक्ष करत आहे. तात्काळ माझे घरगुती बिघाड झालेले वीज मीटर बदलून नवीन वीज मीटर लावण्यात यावे. ज्या कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केला असेल त्या कर्मचाऱ्याची प्रशासकीय चौकशी करून त्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी व मला या समस्या पासून मुक्त करावा अशी विनंती संबंधित अधिकाऱ्याला केली आहे. जिवती तालुक्यातील वीज धारक ग्राहकांच्या समस्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन समस्याच्या निपटारा करावा अशी तालुक्यातील ग्राहकांची मागणी आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत